Orange Growers Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांचे आज मंथन बैठक

राज्यात सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्र असलेल्या अमरावती व नागपूर जिल्ह्यातच विमा कंपन्यांनी विमा हप्त्यात वाढ केली आहे.

Team Agrowon

अमरावती : राज्यात सर्वाधिक संत्रा लागवड (Orange Growers) क्षेत्र असलेल्या अमरावती व नागपूर जिल्ह्यातच विमा कंपन्यांनी विमा (Insurance) हप्त्यात वाढ केली आहे. या विरोधात पुढील रणनीती ठरवण्याकरता आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज (ता. ८) दुपारी तीन वाजता कुरळपूर्णा येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये संत्रा व मोसंबी लागवड केली जाते. त्यामधील सर्वाधिक एक लाख हेक्टर लागवड क्षेत्र हे अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टरवर लागवड होते.

विमा कंपन्यांनी हीच बाब हेरत सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या अमरावती जिल्ह्यात आंबीया या बहाराकरिता बारा हजार रुपये, तर नागपूर जिल्ह्यासाठी वीस हजार रुपये असा वाढीव विमा हप्ता आकारला आहे. अकोला जिल्ह्यात केवळ सहा हजार रुपये विमा हप्ता आहे. हा विरोधाभास दूर करावा या मागणीसाठी संत्रा उत्पादक संघर्ष समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढा देण्याची तयारी देखील शेतकऱ्यांनी चालवली आहे.

त्यातच आता या मुद्द्यावर आंदोलनाची दिशा ठरविणे,संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव कथन, संवाद व चर्चासत्र असा एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खुद्द बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आहे.चांदूरबाजार तालुक्यातील अपंग पुनर्वसन केंद्रात मंगळवारी (ता.८) ही बैठक होईल. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT