Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : फळपीक विम्यात घोटाळ्याचा संशय; फळबागा तपासणीचे आदेश

कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण व राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्याकडून केंद्र शासनाची यंत्रणादेखील या प्रकरणाची माहिती गोळा करीत आहे.

Team Agrowon

Crop Insurance Scheme पुणे ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत (Fruit Crop Insurance) मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा संशय आल्यामुळे राज्यातील विमा संरक्षित फळबागांची तपासणी करण्याचे आदेश कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिले आहेत.

आयुक्तांनी एकाच वेळी ही तपासणी करण्याचे आदेश जारी केल्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने पथके तयार केली आहेत.

ही पथके सध्या राज्यातील संशयास्पद बागांची तपासणी करीत आहेत. गैरव्यवहार करणारी यंत्रणा शेतकऱ्यांना फसवून खोट्या माहितीच्या आधारे परस्पर विमा उतरवून नुकसान भरपाईच्या रकमा लाटत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे.

कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण व राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्याकडून केंद्र शासनाची यंत्रणादेखील या प्रकरणाची माहिती गोळा करीत आहे.

२०२२ ते २४ या कालावधीसाठी फळपीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे. नियमानुसार एका शेतकऱ्याला फक्त चार हेक्टरपर्यंतच विमा काढता येतो.

तसेच, एका वर्षात एका क्षेत्रावर मृग किंवा आंबिया यापैकी एकाच हंगामाकरिता विमा मिळतो. मात्र शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर जादा क्षेत्राचा विमा काढला जात असल्याचे आढळून आले आहे.

कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे, की फळपीक विमा योजनेत आढळून आलेल्या काही बाबी गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे आंबिया बहर २०२२-२३ मधील विमा संरक्षित बागांची १०० टक्के क्षेत्रीय तपासणी करावी.

महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने काटेकोर तपासणी करावी व तपासणीअंती सर्व अहवाल कृषी आयुक्तालयाला सादर करावेत. तपासणीत बोगस पीक विमा प्रकरण आढळून आल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील फळपीक विमा जिल्हा संनियंत्रण समितीसमोर अहवाल सादर करावे.

समितीने दिलेल्या निर्णयानुसार या बोगस प्रकरणांबाबत कारवाई करावी व आयुक्तालयाला अहवाल सादर करावेत, असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

बुलेट्स पॉइंट्स

आतापर्यंतच्या चौकशीतील माहिती अशी...

- कोल्हापूरच्या शिरोळ भागातील मौजे आलास गावातील ३६ शेतकऱ्यांच्या नावे बोगस द्राक्ष विमा उतरवला गेला

- जळगाव जिल्ह्यातील आंबिया बहारात केळीची लागवड मूळ पेऱ्यापेक्षा दीडपट जादा दाखविली

- फळपिकांचे क्षेत्र व दूरस्थ संवेदन प्रणालीने दर्शविलेले क्षेत्र याचा ताळमेळ लागत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमागील पायाभूत तंत्रज्ञान

Turmeric Quality: जानेफळ येथे हळद गुणवत्ता सुधार विषयावर प्रशिक्षण

Livestock Shed Management: आधुनिक तंत्रज्ञानातून गोठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT