manrega  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

MGNREGA : ‘मनरेगा’तून शाश्वत विकास साधणारी कामे राबवा : गोयल

तिवसा तालुक्यातील सार्सी, पालवाडी येथे योजनेतून झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी आयुक्तांनी केली. या वेळी त्यांनी योजनेचे लाभार्थी व मजूरांशी संवाद साधला.

Team Agrowon

अमरावती : ‘‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) (MGNREGA) योजनेतून गावांचा शाश्वत विकास साधणारी विकासकामे प्राधान्याने राबवावीत,’’ असे निर्देश ‘मनरेगा’चे आयुक्त शंतनू गोयल (MGNREGA Commissioner Shantanu Goyal) यांनी येथे दिले.

तिवसा तालुक्यातील सार्सी, पालवाडी येथे योजनेतून झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी आयुक्तांनी केली. या वेळी त्यांनी योजनेचे लाभार्थी व मजूरांशी संवाद साधला.

सरपंच रीना मंजू, उपजिल्हाधिकारी राम लंके, तिवसाचे तहसीलदार वैभव फरताडे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, ग्रामसेवक जी. के. मांगरुळकर आदी उपस्थित होते.

गोयल म्हणाले, ‘‘ग्रामीण नागरिकांचे राहणीमान उंचावेल व गावाची कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण होईल, या दृष्टीने योजनेच्या माध्यमातून पायाभूत सोयींची कामे प्राधान्याने करावीत."

"जलसंधारण व जलसंवर्धन, दुष्काळ प्रतिबंधक कामे, वनीकरण व वृक्ष लागवड, जलसिंचन कालव्यांची कामे, पूरसंरक्षणाची कामे, पाणथळ क्षेत्रात चाऱ्याची कामे, बारमाही जोडरस्त्यांची कामे करावीत."

"गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व गावपातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी मनरेगा योजना महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अधिकाधिक कामे राबवावीत. आवश्यक कामांसाठी आराखडा तयार करून परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी विहित मुदतीत सादर करावेत.’’

‘मनरेगा’तून सार्सी गावात निर्माण करण्यात आलेले जनावरांचे गोठे, शेतातील विहीर बांधकाम तसेच पालवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षणासाठी भिंत बांधकाम, वृक्ष लागवड आदी कामांची पाहणी आयुक्तांनी केली.

लाभार्थी व मजुरांशी संवाद साधून त्यांनी कामाची माहिती व मजुरांच्या अडचणी जाणून घेतल्या. वैयक्तिक विहीर बांधकामांद्वारे शेत परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. शेतीपिकांचे उत्पादनात वाढ झाली आहे. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवावीत,’’ अशी सूचना गोयल यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT