Agriculture Electricity  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Free Electricity: देशभरातील शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ

फुकट गोष्टी देण्याच्या प्रकाराला मोदी सरकारचा विरोध असतानाही के.चंद्रशेखर राव यांचे आश्वासन

Team Agrowon

पुणे ः २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बिगर भाजप सरकार सत्तेवर आल्यास देशभरातील शेतकऱ्यांना मोफत वीज (Free Electricity) देईल अशी घोषणा तेंलगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केली. विशेष म्हणजे राजकीय पक्षांकडून फुकट गोष्टी (Revdi Culture) देण्याच्या प्रकाराला मोदी सरकारने कडाडून विरोध केला असताना त्याला न जुमानता राव यांनी हे वक्तव्य केले आहे.

देशात बिगर भाजप पक्षांची फळी उभी करण्यासाठी राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banrjee), बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार (Nitish Kumar) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar rao) त्यात आघाडीवर आहेत.

राव यांनी नुकतेच निजामाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) लोकांच्या पाठिंब्याने भारताचा चेहरा बदलेल, तसेच लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही लवकरच निजामाबादमधून राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक प्रचाराला सुरुवात करु, असेही राव यावेळी म्हणाले.


देशभरातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सुमारे १.४५ लाख कोटी रूपयांचा खर्च येईल, असे राव यांनी सांगितले. परंतु मोदी सरकारची तशी इच्छाशक्ती नाही, असे ते म्हणाले. देशात बुडित कर्जाचे प्रमाण १२ लाख कोटी रूपयांवर गेले आहे. असे असताना केंद्र सरकार मोफत वीज द्यायला मात्र का तयार नाही, असा सवाल त्यांनी केला.

तसेच केंद्र सरकार शेतकरीविरोधी धोरणं राबवत असून केंद्रात 'भाजप मुक्त' सरकार सत्तेवर येण्याची गरज असल्याचे राव यांनी यावेळी सांगितले. के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची आपली महत्त्वाकांक्षा जाहीर केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसविरोधात आघाडी उघडण्यासाठी राव विविध राज्यांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. तेलंगणातील विकासाचे मॉडेल देशभरात लागू करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे राव यांनी यावेळी सांगितले.

राजकीय पक्षांच्या मोफत आश्वासनांचा, खैरातींचा भार सरकारी कंपन्यांना सोसवत नसल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. मोफत विजेच्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या होत्या की, अनेक राज्य सरकारांनी मोफत वीज देण्यामुळे वीज कंपन्यांना तोटा सहन करावा लागतोय. वीज कंपन्यांचा राजकीय निवडणुकांशी काय संबंध आहे? वीज कंपन्यांनी जनतेकडून मते घेतली नाहीत. त्यांच्यावर राजकीय पक्षांच्या आश्वासनांचा भार कशाला? असेही त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान गुजरात विधानसभेच्या निवडणूका आता तोंडावर आल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष गुजरातमध्ये खैरात वाटण्याच्या मागे लागले आहे. आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाबमध्ये वीज मोफत दिल्यानंतर गुजरातमध्येही वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यातच भर पडली आहे ती कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची. त्यांनीही अहमदाबाद दौऱ्यावर असताना मोफत वीज देण्याची घोषणा केली होती.

आता या सगळ्यांच्या पुढे जात चंद्रशेखर राव यांनी संबंध देशभरातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT