Government Scheme
Government Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Government Scheme : प्रोत्साहनपर लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

टीम ॲग्रोवन

परभणी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ (Mahatma Jotirao Phule Farmers Debt Relief Scheme 2019) अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. पोर्टलवर परभणी जिल्ह्यातील ९ हजार ७४१ शेतकऱ्यांचा आणि हिंगोली जिल्ह्यातील ९ हजार ३२७ लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) उमेशचंद्र हुशे (Umeshchandra Hushe) (परभणी), एस.एल.बोराडे (S.L. Borade) (हिंगोली) यांनी दिली.

या अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांत घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यंत लाभ मिळणार आहे. या तीन वर्षांपैकी शेवटच्या वर्षात कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ८४८ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. विशिष्ट क्रमांकासह ९ हजार ७४१ लाभार्थींची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. बँकस्तरावर संबंधित शाखा तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

आजवर १ हजार २७३ लाभार्थींनी आधार प्रमाणीकरण करून घेतले आहे. अजून ८ हजार ४६८ प्रमाणीकरण प्रलंबित आहे. यादीतील पात्र खातेदार लाभार्थी यांनी संबंधित बँकेची शाखा, आपले सरकार केंद्र येथे जाऊन बुधवार (ता. १९) आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा उपनिबंधक हुशे यांनी केले आहे.

हिंगोलीत ९३२७ शेतकऱ्यांची पहिली यादी...

हिंगोली जिल्ह्यात या योजनेत पात्र असलेल्या ९ हजार ३२७ शेतकऱ्यांची पहिली यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यात यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विशिष्ट क्रमांकासहची यादी संबंधित बँका.

सेवा केंद्र व गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण घ्यायचे आहे.शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ३९ शाखांमध्ये आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) बोराडे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT