कृषी योजना व शासन निर्णय

Swanidhi Scheme : ‘स्वनिधी’तून लघू उद्योजकांचा आर्थिक विकास शक्य

लघू उद्योजकांना रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेतून वित्तपुरवठा केला जात आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : लघू उद्योजकांना (Small Business Holder) रोजगार निर्मितीसाठी (Employment Generation) पंतप्रधान स्वनिधी योजनेतून (PM Swanidhi Scheme) वित्तपुरवठा केला जात आहे. फेरीवाले, फळविक्रेते (Fruit Seller), धोबी, चर्मकार यांच्यासह इतर व्यवसायिकांना स्वनिधीतून १० हजारांपर्यंतचा अल्प दरात कर्जपुरवठा केल्याने स्थानिक पातळीवर व्यावसायिकांचा आर्थिक विकास साध्य केला जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केले.

महानगर पालिका औरंगाबाद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक समावेशन व वित्त साह्य अभियान मेळाव्याचे उद्‍घाटन श्री. कराड यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ६) संत एकनाथ रंगमंदिर येथे झाले. या अभियानात लाभार्थ्यांना स्वनिधी कर्ज योजनेचे धनादेश वाटप डॉ.कराड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा, रोहित कशाळकर,उपस्थित होते.

डॉ कराड म्हणाले, की स्थानिक लोकांना व्यवसायासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेतून मदत केली जात आहे. सर्व बँकांनी व जिल्हा प्रशासनाने कर्ज मिळवून देण्यामध्ये सहकार्य करावे असे निर्देशही डॉ. कराड यांनी संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, की प्रधानमंत्री स्वनिधी योजना व्यवसायाबरोबर माणसं उभी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, असल्याचे चव्हान म्हणाले.

प्रातिनिधिक स्वरूपात वितरण

लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात १० हजार रुपये रकमेचा धनादेशांचे वाटप करण्यात आले. यामध्ये बुद्धम बोराडे, रईस अली, दिव्या हुबळीकर, दीपा बनकर, बाळासाहेब हिवराळे, किरण खांडेकर, जीवन कडुकर, ज्योती खरात, रेश्मा शेख, साजेद गुलाम साजेद शेख यांचा समावेश होता. याबरोबरच मुद्रा योजनेअंतर्गत गणेश सूर्यवंशी व कृष्णा सूर्यवंशी, यांना दुग्ध व्यवसायासाठी ७ लाख ८० हजारांचा धनादेशही देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Department Action: कांदळवन कारवाईवर संशय

Milk Adulteration: ‘एफडीए’च्या कारवाईने दुग्ध व्यवसायात खळबळ

Women In Agriculture: ससून नवघरच्या डोंगरावर बहरली फळबाग

Village Road: पंचवीस वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद मिटला

Tur Crop Insurance: चौदा मंडलामध्ये तुरीचा २२ कोटी १३ लाख रुपये पीकविमा परतावा देय

SCROLL FOR NEXT