Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive subsidy : शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत मिळणार प्रोत्साहन अनुदान

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील २३ लाख शेतकरी नियमित कर्जदार (Regular Loan Holder Farmer) आहेत. त्यांना तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान (Farmer Incentive subsidy) (प्रत्येकी ५० हजार रुपये) मिळणार आहेत. आठ लाख २९ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे.

दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना १८ ऑक्टोबरला अनुदान रक्कम वितरित केली जाईल. परंतु, १८ जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सुरु आहे. त्यामुळे तेथील जवळपास १४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान मिळणार आहे.

अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटात अडकलेल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांना अद्याप अनुदान मिळाले नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारने आता २०१७ ते १८, १८ ते १९ आणि १९ ते २०२० या तीन वर्षांतील कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची परतफेड केलेल्यांना हा लाभ दिला जाईल. ही रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास १२ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातून अडचणीतील जिल्हा बॅंकांचीही थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर या जिल्हा बॅंकांना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे. सरकारने आता कर्जमाफीऐवजी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जवितरणावर भर देण्याचे नियोजन केले आहे. सरकारने निर्णय घेतल्यापासून राज्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळाले आहे.

अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वीच

यंदा बहुतेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २१ जिल्ह्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने चार हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक व सततचा पण ६५ मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनाही भरपाई दिली जात आहे. दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

प्रोत्साहनपर अनुदान तीन टप्प्यांत

शेतकऱ्यांची पहिली यादी

८.२९ लाख

प्रोत्साहनाचे अनुदान

४,००० कोटी

शेतकऱ्यांची दुसरी यादी

१० लाख

अनुदानाची रक्कम

५,००० कोटी

शेतकऱ्यांची तिसरी यादी

४.८५ लाख

१,२०० कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT