PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी

आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल, त्यांनी उपलब्ध दुसरा मोबाईल क्रमांक ई-केवायसी करून घेण्यासाठी घेऊन जाणे आवश्यक आहे. या शिवाय स्वतः लाभार्थ्यांलाही कोणत्याही ॲन्ड्रॉइड मोबाईलवरून ई-केवायसी करता येईल.

टीम ॲग्रोवन

वाशीम : ‘‘जिल्ह्यातील पात्र शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Scheme) पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी राहिलेल्या ५० हजार ८८ शेतकऱ्यांनी येत्या चार सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी (PM Kisan e-KYC) पूर्ण करावी,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.जिल्हाधिकाऱ्यांनी ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांबाबत आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते.

षण्मुगराजन एस म्हणाले, ‘‘आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल, त्यांनी उपलब्ध दुसरा मोबाईल क्रमांक ई-केवायसी करून घेण्यासाठी घेऊन जाणे आवश्यक आहे. या शिवाय स्वतः लाभार्थ्यांलाही कोणत्याही ॲन्ड्रॉइड मोबाईलवरून ई-केवायसी करता येईल. जिल्ह्यात १ लाख ८९ हजार ३४४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ५० हजार ८८८ लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यांनी त्वरित ई-केवायसी पूर्ण करावी.’’

‘‘पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व कोतवाल यांनी संबंधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना सीएससी केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर घेऊन यावे. त्यांची ई-केवायसी करण्यासाठी मदत करावी. ॲन्ड्रॉइड मोबाईलवरूनसुद्धा ई-केवायसी करता येते. गावपातळीवर दररोज दवंडी द्यावी. ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे,’’ असे निर्देश षण्मुगराजन एस यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

Paddy Production: जावळीत यंदा भाताच्या उत्पन्नात ५० टक्के घट

Farmer Awareness: शेतमाल नोंदणीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

E Crop Survey: ई-पीक पाहणीत शेतमालाची नोंदच नाही

SCROLL FOR NEXT