PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : ‘शेतकरी सन्मान’मध्ये १०८ बांगलादेशींची नोंदणी

Agriculture Scheme : ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत जिल्ह्यातील डिगस (ता. कुडाळ) येथे तब्बल १०८ बांगलादेशी नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत जिल्ह्यातील डिगस (ता. कुडाळ) येथे तब्बल १०८ बांगलादेशी नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी चौकशीचे आदेश दिले. कुडाळचे प्रांताधिकारी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. जिल्ह्यात १ मे २०२३ पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियत्रंणाखाली हे काम सुरू होते.

गावोगावी सध्या या योजनेअंतर्गत ऑनलाइन दाखल अर्जांची पडताळणी सुरू आहे. कुडाळ तालुक्यातील डिगस येथे १०८ बांगलादेशी नागरिकांनी ‘शेतकरी सन्मान’च्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज केल्याचे उघडकीस आले.

जिल्ह्यात आणखी गावांत असा प्रकार घडला का, याची खातरजमा देखील प्रशासन करीत आहे. या प्रकरणाच्या चौकशी समिती प्रमुखपदी कुडाळचे प्रांताधिकारी आहेत. दोन दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ‘केवायसी लिंक’ करण्याची प्रकिया सुरू आहे. या वेळी डिगसमध्ये १०८ बांगलादेशींनी अर्ज केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी समिती दोन दिवसांत अहवाल सादर करेल.
- मच्छिंद्र सुकटे, निवासी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

Soil Health : जमिनीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे

Nagnathanna Nayakvadi : नागनाथअण्णांसारख्या क्रांतिकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य

Wild Boar : रानडुकराला उपद्रवी वन्य प्राणी घोषित करा

Lumpy Skin Disease: पुण्यात 'लम्पी'चा विळखा; सुप्रिया सुळेंची महापालिका आयुक्तांना उपाययोजनांची पत्राद्वारे विनंती

SCROLL FOR NEXT