PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : वीस दिवसांत १० हजार कुटुंबांचे ई-केवायसी

Agriculture Scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळत आहे.

Team Agrowon

Nanded News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळत आहे. यात पीएम किसान सन्मान निधीसह राज्य शासनाच्या नमो महासन्मानचे हप्ते मिळणार आहेत.

यासाठी कृषी विभागाने प्रलंबित असलेल्या ७८ हजार ७०३ कुटुंबांचे ई-केवायसी करण्याचे काम हाती घेतले आहे. मागील वीस दिवसांत १० हजार ७९४ कुटुंबांचे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पाच लाख १८ हजार ६६७ पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

लाभार्थी कुटुंबाची माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत सन्मान निधीअंतर्गत तेरा हप्त्यांत दोन हजार रुपयानुसार प्रतिवर्ष सहा हजार रुपये ऐवढी रक्कम मिळत आहे. पुढील हप्ते नियमित चालू राहण्यासाठी शेतकऱ्यां‍यांनी ई-केवायसी, तसेच आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.

आजपर्यंत तीन लाख ४६ हजार १६१ कुटुंबाने ई-केवायसीचे काम केले. परंतु अद्याप ७८ हजार ७०३ शेतकरी कुटुंब अद्याप ई-केवायसी प्रलंबित होते. याबाबत कृषी विभागाने ता. २० जूनपासून मोहीम राबवून ता. १३ जुलेपर्यंत १० हजार ७९४ कुटुंबाची ई-केवायसी पूर्ण केले आहे.

सध्या अद्याप ६७ हजार ९०९ शिल्लक आहे. ई-केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच राज्य शासनही नमो महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

तालुकानिहाय प्रलंबीत शेतकरी कुटुंब

अर्धापूर १२५६, नांदेड २९९४, भोकर ३२३४, मुदखेड १६४६, उमरी २५३०, हदगाव ५५८०, किनवट ६६०६, देगलर ५४३१, हिमायतनगर ३१५५, लोहा ६४४४, मुखेड ६६३३, धर्माबाद २३३९, कंधार ६६५७, माहूर ३१००, बिलोली ३८०१, नायगाव ५४६३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT