Dilip Walse Patil Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

तंटामुक्त गाव अभियान पुन्हा सुरू करणार

गृहमंत्री वळसे-पाटील; मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव

टीम ॲग्रोवन

नागपूर ः ‘‘तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राबविलेले ‘तंटामुक्त गाव’ हे महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित अभियान पुन्हा सुरू करणार आहोत’’, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. नागपूर शहर व परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत रविभवन येथे आढावा बैठक झाली. या वेळी ते बोलत होते.

‘‘आर. आर. पाटील यांनी २००८ मध्ये ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान’ राज्यात राबविले होते. त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. मध्यंतरी ते बंद झाले. पुन्हा ते नव्याने सुरू करण्यात येईल. मुख्यमंत्री या अभियानाचे अध्यक्ष असतात. अभियानात अनेक बदल सुचविले आहेत. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यमंत्री कार्यालयात सादर केला आहे,’’ अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली.

योजनेचे स्वरूप

दिवाणी, महसुली, फौजदारी तंट्यासह सहकार, कामगार आदी क्षेत्रांतील तंटे गावपातळीवर सोडविण्यासाठी तंटामुक्त अभियान २००८ पासून सुरू केले. राज्यस्तरावर मुख्यमंत्री, जिल्हा स्तरावर पालकमंत्री अध्यक्ष असलेली समिती आणि जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली कार्यकारी समिती, तालुका स्तरावर तहसीलदार, पोलिस ठाणे स्तरावर ठाणे अंमलदार तर गावपातळीवर ग्रामसभेने ठरवलेले अध्यक्ष अशा सहा समित्या असतात. ग्रामपातळीवरील तंटे आवश्यकतेनुसार या समित्यांकडे जातात. तेथून सामोपचाराने ते तंटे सोडविण्यात येतात. या अभियानात उत्कृष्ट ठरणाऱ्या गावांना आणि अभियानाचा प्रचार, प्रसार करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात.

‘‘शक्ती’तील त्रुटी दूर करणार’

‘‘‘शक्ती’ कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला होता. त्यात त्रुटी काढून तो परत आला आहे. त्या त्रुटी दूर करीत तो लवकरच पुन्हा मान्यतेसाठी पाठविण्यात येईल,’’ अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी ३१.८१ कोटी रुपये मंजूर; दावे निकाली निघणार

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा दिलासा, जामीन मंजूर

Fruit Crop Insurance: आंबा, काजूचे १७ हजार ७५४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Currency Shortage: व्यवहारात कमी मूल्याच्या चलनी नोटांची टंचाई

Kanyadan Yojana: सरकारकडून विवाहखर्चासाठी २५ हजारांपर्यंत आर्थिक मदत; नवविवाहितांना मिळणार आधार

SCROLL FOR NEXT