Protsahanapar' Government Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Scheme : नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदानापासून वंचित

शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबविली आहे. दिवाळीनंतर नियमीत कर्जदार शेतकऱ्यांना कमाल ५० हजार व किमान तीन हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरुवात केली.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यातील सुमारे पाच हजार नियमीत कर्जदार शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून (Farmer Incentive Scheme) वंचित आहेत. संबंधित शेतकऱ्यांची शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन पडताळणी (व्हेरिफिकेशन व कोड) झाली आहे. परंतु त्यांच्या बँकेतील खात्यात प्रोत्साहन अनुदान (Subsidy) अद्याप आलेले नाही.

शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबविली आहे. दिवाळीनंतर नियमीत कर्जदार शेतकऱ्यांना कमाल ५० हजार व किमान तीन हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरुवात केली. त्यासंबंधी शासनाने नियमीत कर्जदारांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपडेट केली. ज्यांची नावे या पोर्टलवर होती, त्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व अंगठा ऑनलाइन पडताळणी करून त्यांना एक सांकेतांकदेखील मिळाला.

ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान बँकेच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. परंतु हे अनुदान एक ते सव्वा महिना झाला तरीदेखील बँकेच्या खात्यात आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. काय त्रुटी आहे किंवा कुठे अडचण आली, याबाबत शेतकरी विचारणा करण्यासाठी बँक, सहायक निबंधक यांच्याकडे जात आहे. पण या विभागात आमचे काम फक्त पात्र शेतकऱ्यांची नावे शासनाला पाठविण्याचे होते, अनुदान शासनाकडून येते.

त्याच्याशी सहायक निबंधक किंवा बँकेचा संबंध नाही, अशी उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात आहेत. यामुळे हा घोळ आणखीच वाढत असून, शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. कोणी समाधानकारक माहिती देत नसल्याने शेतकऱ्यांचा संतापही वाढला आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी, अडचणी दूर करण्यासाठी एक अधिकारी प्रत्येत तालुक्यास नेमला जावा, अशी मागणीदेखील होत आहे. कारण कुणीच जबाबदारी घेत नाही. यामुळे नेमकी अडचण कुठे आहे, हे समोर येत नाही. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनाच प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे.

आम्ही नियमित कर्जदार आहोत. आमचे नाव यासंबंधीच्या यादीत आल्यानंतर आधार, अंगठा देऊन ऑनलाइन पडताळणी झाली, परंतु प्रोत्साहन अनुदान आले नाही. आम्हाला अनुदान केव्हा मिळेल, हे कुणी अधिकारी, बँक सांगत नाही. यामुळे नेमकी अडचण कुठे आहे, हे स्पष्ट होत नाही. - श्रीकांत पाटील, शेतकरी, कठोरा, ता. जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT