Crop Damage Compensation
Crop Damage Compensation  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : ‘क्लेम’ न केलेल्यांचीही पीकविमा भरपाईची मागणी

टीम ॲग्रोवन

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः यंदाच्या खरीप हंगामात (Kharif season) सततच्या पावसाने सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. पीकविमा (Crop Insurance) काढलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्याने त्यांचे सर्वेक्षण झाले. मात्र ज्यांनी विमा काढलेला आहे, पण सूचना दिलेली नसल्याने सर्वेक्षण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांच्या भरपाईचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात यंदाच्या हंगामात काही मंडलांत अतिवृष्टाचा तडाखा बसला होता. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीकविमा काढलेल्यांपैकी काहींनी पूर्वसूचना दिल्याने त्यांच्या पिकांचे सर्वेक्षण झाले. ज्यांनी सूचना दिलेली नव्हती, अशांचे पंचनामे झालेले नाहीत.

वास्तविक अतिवृष्टीने पीकविमा काढलेले व न काढलेल्यांचे सारखेच नुकसान झाले. आता पीकविमा मिळण्याची शक्यता आहे. या भरपाईत सर्वांना मदत मिळणे गरजेचे आहे. कारण पूर्वसूचना न दिल्याच्या कारणाने मदत नाकारणे योग्य होणार नाही.

अनेकदा ग्रामीण भागात मोबाईल सुविधा मिळत नाही. कृषी सहायकांकडे अनेक गावांचा कारभार असल्याने हे कर्मचारी वेळेत भेटत नाहीत. अशा वेळी काही शेतकऱ्यांकडून पूर्वसूचना, अर्ज दिले गेलेले नाहीत. ही वस्तुस्थिती कृषी विभाग, विमा कंपनीलाही माहिती आहे. आता पीकविमा भरपाई देत असताना याही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

यंदा सलग पावसाने खरीप हंगामात सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा एकरी दोन क्विंटलपासून उतारा आहे. कपाशीच्या पिकाचेही असेच नुकसान झाले होते. मॉन्सूनपूर्व पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सुरुवातीला लागलेल्या सर्वच बोंड्या कुजल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांचा सहानुभूतीने विचार करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT