PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : किसान सन्मान’साठी ई-केवायसी पूर्ण करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पोर्टलवरील जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत इ-केवायसी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाकडून सुचित करण्यात आलेले आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Scheme) (पीएम किसान) योजनेतील ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी (PM Kisan e-KYC) पूर्ण करणे प्रलंबित आहेत अशा शेतकरी लाभार्थ्यांनी विनाविलंब ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पोर्टलवरील जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत इ-केवायसी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाकडून सुचित करण्यात आलेले आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंर्गत पात्र शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत इ-केवायसी पूर्ण केल्याशिवाय ऑगस्ट २०२२ नंतरच्या इतर व बाराव्या हप्त्याच्या पुढील हप्ता वितरीत होणार नाही, असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरी शेतकरी लाभार्थ्यांनी विना विलंब ३१ ऑगस्टपर्यंत ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Pest Management: सद्यःस्थितीत कपाशीवर आढळणाऱ्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

Agriculture Department Issue: ऐन हंगामात कृषी विभागाची हाराकिरी

Global Onion Export: धोक्याची चाहूल, उचला योग्य पाऊल

Rainfall Deficit: नद्यांनी वेढलेल्या पाणीदार शिवारात पावसाची ‘आस’

Farmer Company Fraud: शेतकरी कंपन्यांची सव्वा कोटीची फसवणूक

SCROLL FOR NEXT