Crop Damagea Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Damage : पीक नुकसानीची भरपाई देण्याबाबत अधिसूचना जारी

कृषी विभागाकडून सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या चार पिकांचे ६० ते ६८ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. यानुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के भरपाईसाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी मंगळवारी (ता.१३) अधिसूचना जारी करून विमा कंपनीसह शासनाला कळविले आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : खरीप हंगाम २०२२ (Kharip season 2022) मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Wet Drought) खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या बाबत कृषी विभागाकडून (Agricultural Department) सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या चार पिकांचे ६० ते ६८ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. यानुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के भरपाईसाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी (Khushalsingh Pardeshi) यांनी मंगळवारी (ता.१३) अधिसूचना जारी करून विमा कंपनीसह (Insurance Company) शासनाला कळविले आहे.

जिल्ह्यात जुले व ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सात लाख शेतकऱ्यांचे सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाला कळविला. शासनाने मदतीसाठी ७१८ कोटी रुपये मंजूर केले.

परंतु, पीकविमा कंपनीकडून नुकसानीबाबत अग्रिम देण्याची मागणी जोर धरु लागली होती. या बाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी विमा कंपनीच्या माध्यमातून मंडळनिहाय नुकसानीचा अहवाल मागवून घेतला. खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या पिकांचे उत्पादन हे त्या पिकांच्या सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले.

यामुळे परदेशी यांनी विमा कंपनीला एक महिन्याच्या आत या तरतुदीनुसार पात्र सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या अधिसूचित पिकांसाठी भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असे निर्देश दिले. नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना पिकांच्या संभाव्य नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली.

यामुळे जिल्ह्यातील सर्वच मंडलांतील सोयाबीन, कापूस, ज्वारी व तूर या पिकांच्या नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- रविशंकर चलवदे, जिल्हा अधिक कृषी अधिकारी, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Jeevan Mission : वीज जोडणीअभावी रखडले जलजीवन मिशन योजनेचे काम

Sugarcane Damage : आडव्या उसासाठी हवी मदत

Rain Crop Damage : नाशिक विभागात ८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान

Farmer Relief : आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार मदत करा

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

SCROLL FOR NEXT