Banana Tissue Culture Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Subsidy For Banana Farming : केळी उत्पादकांना मिळणार ५० टक्के अनुदान ; बिहार सरकारचा निर्णय

Agriculture Subsidy : राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Banana Farmer Subsidy : केळी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

बिहार सरकारच्या या निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनावरील खर्च कमी होणार असून त्यांचा खिशावरील भार कमी होणार आहे.

टिश्यू कल्चर केळी उत्पादनाला प्रोत्साहन

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार टिश्यू क्लचर पध्दतीने केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना मदत करणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. याबाबतची माहिती बिहार सरकारच्या फलोत्पादन संचालनालयाने ट्विटद्वारे दिली आहे.

उत्पादन खर्चात होणार बचत

एक हेक्टरी केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना जवळपास सव्वा लाख रुपयांपर्यत खर्च येतो. या खर्चावर आता बिहार सरकार ५० टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा केळी लागवडीचा उत्पादन खर्च जवळपास निम्म्यावर येणार आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या खिशावरचा आर्थिक भार कमी होणार आहे. सहाजिकच त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

काय आहे टिश्यू कल्चर तंत्रज्ञान

वनस्पतीच्या एका पेशीपासून संपूर्ण रोपाची, झाडीची निर्मिती करणे, याला टिश्यू कल्चर असे म्हणतात. टिश्यू कल्चर रोपे तयार करण्याासाठी विशिष्ठ वातावरणाची आवश्यकता असते. त्यासाठी कृत्रिमरित्या तयार केलेल्या वातावरणात किंवा प्रयोगशाळेमध्ये टिश्यू कल्चरची निर्मिती केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT