National Food Security Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

National Food Security : राष्ट्रीय अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार पात्र हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत वितरित करावे, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.

Team Agrowon

हिंगोली ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार (National Food Security) पात्र हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत (Free Grain) वितरित करावे, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिकिलो ३ रुपयांनुसार तांदूळ आणि प्रतिकिलो २ रुपयेनुसार गहू आणि प्रतिकिलो १ रुपयानुसार भरडधान्य वितरित करण्यात येते. केंद्र शासनाने १ जानेवारी, २०२३ पासून हे अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अन्नधान्य वितरणाबाबत शासनाच्या नियतन आदेशातील इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील. मोफत अन्नधान्य वितरणानंतर लाभार्थ्यांना द्यावयाच्या पावतीबाबत संगणक कक्षाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

`लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करावी`

केंद्र व राज्य शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना व रास्तभाव दुकानदारांना कळवावे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याबाबत पात्र लाभार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील तलाठ्यांमार्फत प्रत्येक गावांमध्ये दवंडी द्यावी.

त्याबाबतचा पंचनामा अहवाल तलाठ्यांमार्फत प्राप्त करून घेऊन कार्यालयात जतन करून ठेवावा व दवंडी दिल्याबाबतचा संकलित पंचनामा अहवाल त्वरित सादर करावा, असे आदेश धरमकर यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT