Farmer Accident Insurance Scheme
Farmer Accident Insurance Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Accident Insurance Schemes : शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

Team Agrowon

Solapur News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) मृत शेतकऱ्यांच्या सात वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच येथे प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (MP Ranjit Singh Naik Nimbalkar), आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh), आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Avtade), जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातून २६३ प्रस्ताव प्राप्त झाले होते व सर्व प्रस्ताव कंपनीकडे दाखल केले होते. त्यातील १६० प्रस्ताव मंजूर झाले. ५७ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असून, ४६ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत.

याअंतर्गत ३ कोटी १७ लाख रुपये विमा वाटप करण्यात आले. तसेच ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या खंडित कालावधीमधील १०५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ८५ प्रस्ताव आयुक्तालयास सादर करण्यात आले. पैकी ६७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

३८ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत १ कोटी ३४ लाख रुपये मदत वाटप करण्यात आली आहे. सध्या प्रातिनिधीक स्वरूपात धनादेश वितरण करण्यात आले असून, उर्वरित वारसांना देण्यात येणारी मदत आरटीजीएसद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

मदत मिळालेले शेतकऱ्यांचे वारस

अंजली ज्ञानेश्वर साठे (दारफळ बी.बी, ता. उ. सोलापूर), श्रीदेवी लालचंद माळी व पुष्पा विश्वनाथ स्वामी (दर्गनहळ्ळी, ता. द. सोलापूर), आशाबाई वसंत माळी (आलेगाव, ता. द. सोलापूर), मदिना नरोकीन दाखने (शिरवळ, ता. अक्कलकोट), भाग्यश्री श्रीशैल कापसे (जेऊर, ता. अक्कलकोट), धुंडावा बसवराज मद्री (करजगी, ता. अक्कलकोट) अशी मदत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांची नावे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT