Agriculture Technology Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Department : मूल्य साखळी विकास शाळा कार्यक्रमाला शेती शाळाची जोड

जालना येथील आत्मा कार्यालयाची माहिती

Team Agrowon

जालना : कृषी विभागाच्या (Department of Agriculture ) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा (ATMA) अंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प हा जालना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्य साखळी विकास शाळा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याला शेती (Agriculture) शाळाची जोड देण्यात आली आहे.

या शेतीशाळेत सध्या चालू असलेल्या हंगामाबद्दल, एका पिकाबद्दल शेतकऱ्याला सर्वंकष माहिती दिली जाते. त्यामुळे ज्या पिकाची शेतीशाळा असेल, ते पीक किती कालावधीचे असते तेवढे दिवस या शाळा भरतात. या शाळेत किमान ३० शेतकरी असतात.

ज्या पिकाची शेतीशाळा असेल त्या पिकाच्या नवीन तंत्रज्ञानानुसार प्लॉट घेतला जातो. माती तपासणीपासून ते पीककाढणीपर्यंतचे तंत्रज्ञान त्याला पुरविले जाते. नवीन जातीचे बियाणे, लागवड पद्धत, अन्नघटक व मूलद्रव्यांची कमतरता, पाणी कधी द्यायचे, पिकाच्या पानांवर दिसणारी लक्षणे, खुणा, त्या ओळखायच्या कशा व त्यावर काय उपाययोजना करायची येथपासून ते प्रत्यक्ष पीककाढणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन ‘आत्मा’च्या स्मार्ट प्रकल्पातून केले जाणार आहे.

हरभरा पिकाची शेतीशाळा
आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हरभरा पिकाची शेतीशाळा ममदाबाद येथे घेण्यात आली. या वेळी स्मार्टचे नोडल अधिकारी श्रीकांत देशपांडे, तेजस शिंदे, यांच्यासह आत्माचे दत्तात्रेय सूर्यवंशी, सचिन राठोड यांची उपस्थिती होती.

दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शेतीशाळा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. स्मार्ट प्रकल्पाचे श्रीकांत देशपांडे यांनी पेरणी पूर्वी घ्यावयाची काळजी, बीजप्रक्रिया, जोड ओळ पद्धतीने लागवड व बिबिफ पद्धतीने लागवड, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

तेजस शिंदे यांनी स्मार्ट प्रकल्पाची ओळख उपस्थित शेतकऱ्यांना करून दिली. आत्माचे सचिन राठोड यांनी जोड ओळ पद्धतीने हरभरा लागवड यावर मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा पिकाच्या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले प्युअर अँड परफेक्ट फार्मर्स प्रो कंपनी लि.चे किरण मुंढे, मोहन मुंढे, पितळे यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपन्या मधील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT