PM Kisan Yojna News Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर योजनेसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या यादीतील १०हजार ५७४ शेतकऱ्यांपैकी २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Farmer Loan Waive Scheme) प्रोत्साहनपर योजनेसाठी (Farmer Incentive Scheme) पात्र ठरलेल्या पहिल्या यादीतील १०हजार ५७४ शेतकऱ्यांपैकी २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification) अजूनही बाकी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेस महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे २९ जुलै, २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत शासनाचे निर्देशानुसार २०१७-१८ ते २०१९-२० या तीन आर्थिक वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सह. संस्था, तसेच राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण बँकाकडुन घेतलेल्या अल्पमुदती पीककर्जाची कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये मुद्दल व व्याजासह पूर्णतः: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वैयक्तीक शेतकरी हा निकष विचारात घेऊन एक किंवा एकापेक्षा अनेक बँकांकडून घेतलेली अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन असे शेतकरी शासनाचे रक्कम ५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील असे जाहीर केले आहे.

या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये चालू आहे. आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण प्राधान्याने तत्काळ पूर्ण करण्याच्या तसेच पोर्टलवर निर्माण झालेल्या प्रलंबित टीएलसी- डीएलसी तक्रारी प्राधान्याने निकाली काढणेच्या सूचना मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी गुरूवारी (ता. १)रोजीचे दुरचित्रवाणी सभेमध्ये दिल्या आहेत.

त्यामुळे प्रोत्साहनपर योजनेची रक्कम संबंधित शेतकऱ्यांचे बचत खात्यावर जमा होणार असल्याने आपले संबंधित बँक शाखेत, नागरी सेवा केंद्रात, सी.एस.सी.सेंटर, आपले सेवा केंद्र येथे तत्काळ संपर्क साधून आपले आधार प्रमाणिकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेण्याची सूचना जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी केली आहे.

१० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत शासनाने १३ ऑक्टोबर रोजी पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण १०५७४ शेतकऱ्यांचा समावेश होता. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या यादीपैकी पोर्टलवरील ता. १ डिसेंबरच्या आकडेवारी नुसार एकूण १०२८६ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी ९४५१ शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर ३३ कोटी ९४ हजार लाभाच्या रक्कमा जमा झालेल्या आहेत. २८८ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण अद्याप पूर्ण केलेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT