POCRA Shmeme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

POCRA Subsidy : ‘पोकरा’अंतर्गत ७९ कोटी ६३ लाखांवर अनुदान वितरित

पोकरा अंतर्गतच्या तीन टप्प्यात परभणी जिल्ह्यातील २७५ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील ६० हजार ४५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत (POCRA Project) वैयक्तीक लाभाच्या घटकांची कामे पूर्ण केलेल्या परभणी जिल्ह्यातील २७ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीव्दारे (DBT) शी माहिती उपविभागीय अधिकरी आर. बी. हरणे यांनी दिली.

पोकरा अंतर्गतच्या तीन टप्प्यात परभणी जिल्ह्यातील २७५ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील ६० हजार ४५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. वैयक्तिक लाभाच्या घटका अंतर्गत १ लाख ७१ हजार ७२५ अर्ज केले आहेत. फळबागा लागवड केलेल्या १ हजार ९७१ शेतकऱ्यांना ८ कोटी ३३ लाख रुपये अनुदान देण्यात आले. ठिबक सिंचन संच खरेदी केलेल्या २ हजार ८३५ शेतकऱ्यांना १९ कोटी ४ लाख रुपये, तुषार संच खरेदी केलेल्या १४ हजार ३०३ शेतकऱ्यांना २५ कोटी ८२ लाख २८ हजार १५० रुपये अनुदान अदा केले आहे.

विहीरी खोदलेल्या १२० शेतकऱ्यांना १ कोटी ९६ लाख रुपये, पाणी उपसा पंप खरेदीबद्दल ७९४ शेतकऱ्यांना १ कोटी ६ लाख रुपये, पाइप खरेदीबद्दल १ हजार ५७६ शेतकऱ्यांना ३ कोटी ९ लाख ७७ हजार ४६५ रुपये अनुदान देण्यात आले. सामुहिक शेततळ्यांच्या ८६ कामे पूर्ण केलेल्या लाभार्थींना ३ कोटी रुपये तर वैयक्तीक शेततळ्यांचे ५४ शेतकऱ्यांना ६ कोटी ३९ लाख ४ हजार ४ रुपये अनुदान दिले आहे. बीजोत्पादन बद्दल ४ हजार ३०७ शेतकऱ्यांना ४ कोटी रुपये, शेडनेटगृह उभारलेल्या ७४ शेतकऱ्यांना ७ कोटी रुपये, पॉलिहाऊस, शेडनेट साहित्यासाठी २० शेतकऱ्यांना १७ लाख ७१ हजार ८८ रुपये, रेशीम शेतीसाठी २१ शेतकऱ्यांना १३ लाख २२ हजार ७५६ रुपये अनुदान अदा केले आहे. कृषी यांत्रिकीकरण साठी ५२४ शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाख ४९ हजार रुपये, बीबीएफ तंत्रज्ञान प्रसारासाठी ३५ शेतकऱ्यांना ४९ हजार ६६० रुपये अदा केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT