Crop Damage Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : नुकसानीच्या ५२ हजार पूर्वसूचना नाकारल्या

अतिवृष्टीने जिल्ह्यात शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार शेतकऱ्‍यांनी पूर्वसूचना दाखल केल्या होत्या.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : अतिवृष्टीने जिल्ह्यात शेतपिकांचे अतोनात नुकसान (Heavy Rain Crop Damage) झाले. पंतप्रधान पीकविमा योजनेत (Crop Insurance scheme) जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार शेतकऱ्‍यांनी पूर्वसूचना (Crop Damage Intimations) दाखल केल्या होत्या. त्यातील ५२ हजार पूर्वसूचना पीकविमा कंपनीने (Crop Insurance Company) नाकारल्या. अतिवृष्टी झाली त्यादिवशीची तारीख व अर्जावरील तारखेत तफावत असल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, हा प्रश्‍न कायम आहे.

यंदा जुलै व ऑगस्ट या महिन्यांत पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीत व नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठालगतच्या शेतात पाणी शिरले. त्याचा फटका शेतपिकांना बसला. अतिपाण्यामुळे पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.

यंदा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर अशा सलग चार महिन्यांत पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे क्षेत्र ५० टक्क्यांवर गेले आहे. उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्‍यांनी पीकविमा कंपनीकडे नुकसानाची माहिती पाठविली. जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा उतरविला आहे.

मात्र पूर्वसूचना दाखल करूनही ५२ हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पीकविमा कंपनीने नाकारल्या. कृषी विभागाने यासंदर्भात पीकविमा कंपनीला माहिती दिली. त्यानंतर आता परत प्रक्रिया राबवावी लागेल. त्यानुसार ऑफलाइन प्रस्ताव पुन्हा दाखल केले आहेत.

पीकविमा कंपन्यांनी प्रस्ताव नाकारले असले तरी त्यांच्याकडे दुबार अर्ज केले आहेत. अर्ज वारंवार करता येतात. त्याआधारे सर्वांनाच वीमा भरपाई मिळेल, अशी अपेक्षा आहे.
नवनाथ कोळपकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT