Pune News : केंद्र शासनाने पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या प्रकल्पाकरिता ५० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी-मेंढी पालनाकरिता विविध प्रकारचे अनुदान देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने १०० मादी आणि ५ नर याकरिता दहा लाख रुपये, २०० मादी आणि १० नर याकरिता २० लाख रुपये, ३०० मादी आणि १५ नर याकरिता ३० लाख रुपये, ४०० मादी आणि २० नर याकरिता ४० लाख रुपये, ५०० मादी आणि २५ नर याकरिता ५० लाख अशी आहे. कुक्कुटपालनाकरिता २५ लाख रुपये, वराहपालनाकरिता ५० मादी आणि ५ नर याकरिता १५ लाख रुपये, १०० मादी आणि १० नर याकरिता ३० लाख आणि पशुखाद्य व वैरण विकास यासाठी ५० लाख रुपये, असे अनुदान देण्यात येणार आहे.
प्रकल्पाकरिता स्व-हिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. या योजनेचा लाभ व्यक्तिगत व्यावसायिक, स्वयंसाह्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम आठअंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दूध उत्पादक संस्था, सहजोखीम गट (जेएलजी) सहकारी संस्था, खासगी संस्था, स्टार्टअप ग्रुप घेऊ शकतात.
या योजनांच्या लाभाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत) छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक इ. सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून, अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी इ. उपलब्ध असल्यास सादर करावे.
या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमुना इ. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ http://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ http://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे. तरी पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक व्यक्तीनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.