sandeep Shirguppe
सरकारने शेतकऱ्यांसाठी पशुपालन करण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे.
या योजनेमुळे व्यवसाय करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशीवर कर्ज देणार आहे. शेळी पालन किंवा कुक्कुटपालन यासाठी बँकेकडून कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता पशुपालन करण्यासाठी जास्त अडचणी येणार नाहीत.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना १ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज फक्त चार टक्के व्याजावर दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो व्यक्ती लाभ घेणार आहे त्यांना बँकेकडे अर्ज करावा लागेल.
तसेच जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती सोबत जोडावी लागणार आहेत.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करण्याचा विचार सुरू आहे त्या शेतकऱ्यांना ही मोठी संधी आहे.
गाई म्हशींची किंमत जास्त असल्यामुळे अनेकजण जनावरे खरेदी करू शकत नाही, मात्र आता शेतकऱ्यांसाठी सरकारने पशुपालनाबाबत नवी योजना आणल्याने फायदा होणार आहे.