Government Scheme
Government Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Government Scheme : शेतकरी सन्मान योजनेसाठी पाच लाख ई-केवायसी पूर्ण

टीम ॲग्रोवन

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत (PM Kisan Sanman Yojna) शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जात आहेत. शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभासाठी बँकेतील खात्याला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडणे (ई-केवायसी) (E-KYC) बंधनकारक करण्यात आले आहे.

या योजनेचे जिल्ह्यात ६ लाख ३७ हजार २५८ लाभार्थी आहेत. त्यापैकी ५ लाख १६ हजार २४९, म्हणजेच ८१ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी जोडणी पूर्ण केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेची सुरुवात उत्तर प्रदेशमध्ये केली होती.

गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती, बी-बियाणे खरेदी, खते घेण्यासाठी मदत करणे होता. केंद्र सरकार वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते.

पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी केले जाऊ शकते. ई-केवायसी सीएससीवर शेतकऱ्याच्या बोटांच्या ठशाद्वारे पूर्ण केले जाते. यासोबतच सामाईक सेवा केंद्रावर या कामासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

सेवा केंद्रावर ई-केवायसीची फी १५ रुपये आहे.तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या (कंसात ई-केवायसी) ः नगर ः ३८ हजार ८९८ (२९ हजार ९९६), नेवासे ः ५६ हजार ३०१ (४८ हजार १५३), श्रीगोंदे ः ५८ हजार ४१० (४८ हजार ५४), पारनेर ः ५९ हजार१४६ (४७ हजार ६०), पाथर्डी ः ४७ हजार ५९ (३७ हजार ९११), शेवगाव ः ५८ हजार ४९१ (४६ हजार १२६),

संगमनेर ः ६५ हजार ७२१ (५५ हजार ६३५), अकोले ः ३९ हजार ६९२ (२८ हजार ९६३), श्रीरामपूर ः २४ हजार १४ (२१ हजार २९०), राहुरी ः ४२ हजार ९६१ (३५ हजार ३७७), कर्जत ः ५१ हजार ४४६ (४१ हजार ५५३), जामखेड ः ३४ हजार ४४ (२६ हजार ६७१), राहाता ः २७ हजार ८६३ (२१ हजार ९२), कोपरगाव ः ३३ हजार २१२ (२८ हजार ३६८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT