Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : मराठवाड्यात ४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात खरिपाचा पीकविमा उतरविण्याचे काम गतीने सुरू आहे. परंतु या विमा उतरविण्याच्या कामात सर्वर डाउन होण्यासह इतर अडचणींनी खोडा घालण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता. २९) ७४ लाख ६०३ शेतकऱ्यांनी पीकविमासाठी अर्ज सादर केले.

त्यामधून जवळपास ४१ लाख ९६ हजार १८७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यातील १६ लाख ४७ हजार ९५६ हेक्टर क्षेत्रासह लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यातील २५ लाख ४८ हजार २३१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. प्रति अर्ज एक रुपया याप्रमाणे शेतकऱ्यांकडून आठही जिल्ह्यात ७४ लाख १६२ रुपये शेतकरी हिस्सा जमा झाला आहे.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत तीन जिल्ह्यातील ३६ लाख १७ हजार ३६२ रुपये तर लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत पाच जिल्ह्यातील ३७ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा समावेश आहे.

अनेकदा सर्वर डाऊनच्या तक्रारी आल्यानंतर त्यावर कृषी विभाग व संबंधित यंत्रणांकडून लक्ष देण्यात आले. परंतु शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा एकदा सर्वर डाऊन, गट नंबर, खाते नंबर टाकल्यानंतर शेतकरी व्हेरिफाय न होणे, प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तासन्‌तास ताटकळावे लागणे हे प्रकार सातत्याने घडत आहेत.

अजूनही अनेक शेतकऱ्यांचा पीकविमा उतरविणे बाकी आहे. जाफराबाद तालुक्यातील सिताफळ उत्पादकांचा मंडळ विमा कक्षेत येण्यासाठीचा प्रश्न कायम आहे. सीएससी सेंटर चालकांना शेतकऱ्यांची कागदपत्रे पीकविमा उतरविण्यासाठी घेऊन ठेवावी की कशी, कारण मुदतीत विमा उतरविला गेला नाही तर शेतकऱ्यांचा रोष ओढ होऊ शकतो असा प्रश्न पडतो आहे. त्यामुळे निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणी पाहता ३१ जुलै पूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकाचा विमा उतरवू देतील का हा खरा प्रश्न आहे.

दोन दिवसांपासून सीएससी सेंटरवर विमा उतरवण्यासाठी चकरा मारतोय. परंतु सर्व्हर डाउन व इतर तांत्रिक अडचणीमुळे विमा उतरवणे अजूनही शक्य झाले नाही.
- ज्ञानेश्वर गिते, देवगाव ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
आमच्या तालुक्यातील तीन मंडळ सीताफळाच्या पीकविमासाठी पात्र ठरावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु अजून त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे जवळपास दीडशे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचा पीकविमा उतरविला गेला नाही.
- संजय पाटील मोरे, सिताफळ उत्पादक, नळविहिरा ता. जाफराबाद, जी. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT