Food Prcessing Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Food Processing : बारामती कृषी उपविभागाकडे अन्नप्रक्रियेचे ३९८ अर्ज

पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते.

Team Agrowon

बारामती : पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (Food Processing) ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही योजना कृषी विभागामार्फत (Agriculture Subdivision) राबविण्यात येते. बारामती उपविभागात आतापर्यंत एकूण ३९८ प्रकल्पांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ६४ अन्नप्रक्रिया प्रकल्पाच्या अर्जांना मंजुरी दिली आहे. तर १०५ प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्रकल्पास खर्चाच्या ३५ टक्केपर्यंत अनुदान दिले जाते. योजनेचे निकष बदलण्यात आले असल्याने अन्न प्रक्रियेसंदर्भातील इतर उद्योगांनाही अनुदान मिळेल. त्यामुळे अनेक प्रक्रिया उद्योगधारक अर्ज करत आहेत. बारामती तालुक्यातून ८२, दौंड तालुक्यातून १४१, इंदापूर तालुक्यात १०९ व पुरंदर तालुक्यात ६६ असे ३९८ अर्ज दाखल झाले आहेत. या योजनेत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सहभाग घेता येतो.

उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी, उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांच्या नवीन उद्योगांना प्रधान्य दिले जाते. या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या क्षमतेनुसार वैयक्तिक लाभार्थ्यास १० लाख रुपये व उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना ३ कोटींपर्यंत अनुदान देय आहे. एखादा शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारू शकतात.

ही योजना राबविण्यासाठी उद्योगामध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत. अर्जदाराचा उद्योगावर मालकी हक्क असावा. अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल. प्रकल्पाच्या किंमत व खेळत्या भांडवलासाठी किमान १० ते ४० टक्के लाभार्थी हिस्सा व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतीमालाचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल.

‘कृषी विभागाशी करा संपर्क’

शेतकरी, उत्पादक गट कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्थांनी योजनेत सहभाग नोंदवून लाभ घ्यावा. अर्ज करण्यासाठी व अन्य माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पुढील ५ दिवस पाऊस कमी; पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Crop Damage Compensation : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या ः पालकमंत्री पाटील

Solar Project : सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज

Beed Rainfall : बीडमध्ये समाधानकारक पाऊस नाही

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

SCROLL FOR NEXT