Agriculture Mechanization Subsidy  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Mechanization Subsidy : कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना ३५ कोटींचे अनुदान

कृषी विभागाच्या योजनांची ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे अंमलबजावणी केली जात असून शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

Team Agrowon

Agriculture Mechanization Subsidy Pune : कृषी अवजारांच्या (Agriculture Implements) खरेदीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान (Subsidy To Farmer) देण्यात येते. यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization Scheme) रावविले जाते.

या अंतर्गत २०२२-२३ साठी पुणे जिल्ह्यातील कृषी अवजरांच्या खरेदीसाठी ३४ कोटी ३३ हजार रुपये अनुदान (Subsidy For Agriculture Mechanization) वितरित करण्यात आले आहे. याचा जिल्ह्यातील सहा हजार १३४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- पौष्टिक तृणधान्य पिके, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य पिके, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत त्या त्या बाबीमध्ये समाविष्ट यांत्रिक अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केले जाते.

कृषी विभागाच्या योजनांची ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे अंमलबजावणी केली जात असून शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

या बाबी शेतकऱ्यांना ज्या योजनेतून देता येऊ शकतील, त्या योजनांतर्गत पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड केली जाते.

त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ पातळीवरुन प्रभावी संनियंत्रण शक्य झाले आहे.

योजनेंतर्गत येणारी यंत्रे अवजारे -

या योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडे तत्वावर कृषी व औजारे सेवा पुरवठा केंद्रांची उभारणी (सीएचसी) अवजारे बँक आदी बाबी कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत अनुदानासाठी समाविष्ट आहेत.

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील संगणकीय सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी आवश्यक अटींची पूर्तता केलेल्या सहा हजार १३४ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली आहे.

तालुकानिहाय लाभार्थी आणि दिलेले अनुदान पुढीलप्रमाणे-

  • आंबेगाव- ४९४ लाभार्थी- २ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपये

  • बारामती- ८२१ लाभार्थी- ४ कोटी ६७ लाख ७८ हजार रुपये

  • भोर- ३४५ लाभार्थी- २ कोटी ४० लाख २० हजार रुपये

  • दौंड- ७९९ लाभार्थी- ४ कोटी १० लाख १९ हजार रुपये

  • हवेली- २३९ लाभार्थी- १ कोटी २५ लाख ६३ हजार रुपये

  • इंदापूर- ७८२ लाभार्थी- ४ कोटी ७० लाख ४८ हजार रुपये

  • जुन्नर- ५२२ लाभार्थी- ३ कोटी 3 लाख ११ हजार रुपये

  • खेड- ३९४ लाभार्थी- २ कोटी ३३ लाख ५ हजार रुपये

  • मावळ- ६१ लाभार्थी- ५९ लाख ६९ हजार रुपये

  • मुळशी- ८९ लाभार्थी- ९५ लाख ३८ हजार रुपये

  • पुरंदर- ६१२ लाभार्थी- २ कोटी ६४ लाख ६३ हजार रुपये

  • शिरुर - ८८८ लाभार्थी- ४ कोटी ८७ लाख ७० हजार रुपये

  • वेल्हे - ८८ लाभार्थी ४८ लाख ६ हजार रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT