Team Agrowon
मजुरीवर होणाऱ्या खर्चासोबतच वेळेची बचत करण्यात यंत्रांचे मोठे योगदान राहते.
नागपूर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांद्वारे यंत्राचा वापर वाढीस लागला आहे.
कृषी साधनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान देण्यात येते.
या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागतात.
सर्वसाधारण गटातील एससी, एसटी व ओबीसी शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंत लाभ दिला जातो.
नागपूर जिल्ह्यात वर नमूद तिन्ही योजनांकरिता २०२२-२३ साठी ६६०२ लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली.
या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.