Crop Loan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

धुळे जिल्ह्यात पीक विम्यापोटी ३४ कोटी मंजूर

पीक विमा योजनेत तांत्रिक कारणांमुळे धुळे जिल्ह्यावर अन्याय होत होता. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९८ कोटी नुकसान भरपाई मिळालेली होती.

टीम ॲग्रोवन

कापडणे, जि.धुळे : धुळे जिल्ह्याची खरीप २०२१ ची पीक विमा योजनेची नुकसान भरपाई नुकतीच जाहीर झाली. जिल्ह्याला ३४ कोटी मंजूर झाले. एचडीएफसी कंपनीकडून वितरण सुरु झाले आहे. ही नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित, अतिवृष्टी नुकसान भरपाई व पावसाचा मोठा खंड अशी एकत्रित तीन बाबींवर मंजूर झाली आहे.

पीक विमा योजनेत तांत्रिक कारणांमुळे धुळे जिल्ह्यावर अन्याय होत होता. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९८ कोटी नुकसान भरपाई मिळालेली होती. त्याअगोदर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मिळवून दिली होती. त्यांनी अगोदर पीक कापणीची आकडेवारी वास्तव लावलेली होती. परिणामी जिल्ह्याला नुकसान भरपाई जास्त मिळाली होती.

खरीप २०२१ मध्ये पावसाचा मोठा खंड पडलेला होता. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तांत्रिक कारणामुळे योग्य नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता नव्हती. प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मदत केली. राजकीय पातळीवर आमदार कुणाल पाटील व जयकुमार रावल यांनी मदत केली. संबंधित प्रशासकीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, वाल्मीक प्रकाश व विमातज्ज्ञ पाटील यांची एकत्रित बैठक लावली. त्यानंतर पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी वास्तव लावण्यात आली. म्हणूनच ३४ कोटी नुकसान भरपाई मिळाली. कृषिभूषण अॅड. प्रकाश पाटील, कृषिभूषण दिलीप पाटील, साहेबराव पाटील, नामदेव ठाकरे यांनी दोन्ही आमदार द्वयीना भेटून आभार मानले.

तालुकानिहाय प्राप्त भरपाई (आकडे कोटीत)
धुळे तालुका...२१.३८
शिंदखेडा तालुका...९.२८
शिरपूर तालुका...१.४९
साक्री तालुका...१.८३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT