Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : आंबा, काजूचा ३२ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी विम्याचे महत्त्व बागायतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे यंदा ३२ हजार ३९८ आंबा व काजू शेतकऱ्यांनी विमा उतरविला असून, त्यात २६ हजार ५१८ आंबा बागायतदार आहेत.

Team Agrowon

रत्नागिरी ः वातावरणातील बदलाला (Climate Change) सामोरे जाण्यासाठी विम्याचे महत्त्व बागायतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे यंदा ३२ हजार ३९८ आंबा व काजू शेतकऱ्यांनी विमा (Crop Insurance) उतरविला असून, त्यात २६ हजार ५१८ आंबा बागायतदार आहेत. गतवर्षी विक्रमी ९४ कोटी ४१ लाख विमा परतावा शेतकऱ्यांना मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत सव्वासहा हजार अधिक बागायतदारांनी विमा योजनेला प्रतिसाद दिला आहे.

जिल्ह्यात एकूण ६५ महसुली मंडळे असून, त्यात पंधराशेहून अधिक गावे आहेत. २६ हजार ६११ बागायतदारांच्या १४७३२.८९ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला होता. त्यात २२ हजार ३८० आंबा बागायतदार तर ४ हजार २३१ काजू बागायतदार होते. यंदा विमा उतरवणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार ३८९ एकूण शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे.

त्यातील २६ हजार ५१८ आंबा तर ५ हजार ८८० काजू बागायतदार आहेत. विमा घेणार २८ हजार २५१ कर्जदार असून ४ हजार १४७ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख रुपये भरले आहेत.

सर्वाधिक विमा रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यांतील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. तर सर्वात कमी गुहागर तालुका आहे. गतवर्षी विमा उतरवलेल्या शंभर टक्के बागायतदारांना परतावा मिळाला. मागील दहा वर्षांच्या तुलनेत विक्रमी परतावा असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

फयान चक्रीवादळानंतर पुढे बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम हापूसवर होत आहे. उत्पादनात होणारी घट आंबा बागायतदारांसाठी चिंताजनक ठरली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने उत्पन्नावरही परिणाम होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळे तयार होऊ लागल्याने परिणामांची तीव्रता वाढली आहे.

लांबलेला पाऊस, किमान तापमानाचा घटलेला कालावधी, अवकाळी पाऊस आणि अचानक तापमानात होणाऱ्या वाढीमुळे फळगळीचे संकट हापूसवर आहे. मागील दोन वर्षांत फळमाशीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. या बदलांना सामोरे जातानाच नुकसान टाळण्यासाठी बागायतदारांकडून विमा उतरवण्यावर भर दिला जात आहे. तसेच कराराने बागा घेणाऱ्यांनाही विमा उतरवण्याची सूट मिळाल्याने संख्यात्मक वाढ झाल्याचेही अनेकांचे मत आहे.

- विमा परतावा उतरवलेले बागायतदार

तालुका---आंबा बागायतदार---काजू बागायतदार---एकूण क्षेत्र

मंडणगड---२९५३---११३---१४९८.०९

दापोली---१७२६---६९९---१२५३.९४

खेड---२२९८---३११---१२७०.२९

चिपळूण---२६५१---५२२---१६६६.६३

गुहागर--- १६२८---३०८---१०५९.४७

संगमेश्‍वर---४०२७---१८६३---२८६२.१३

रत्नागिरी---५८४१---१४८---३०४१.३०

लांजा---२१७६---१०९७---२३०९.२१

राजापूर---३२८१---८१९---२३१३.०६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT