Rojgar Hami Yojana Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Rojgar Hami Yojana : ‘रोहयो’अंतर्गत कामावर ३१ हजार मजूर

Employment Guarantee Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतीत विविध यंत्रणांची २८८० कामे सुरू आहेत.

Team Agrowon

Nanded Employment Guarantee Scheme News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण र हमी योजनेअंतर्गत (रोहयो) जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतीत विविध यंत्रणांची २८८० कामे सुरू आहेत.

या कामावर ३२ हजार ४८१ मजूर काम करीत आहेत. यात सर्वाधिक ग्रामपंचायत यंत्रणेच्या कामावर तीस हजार ७८१ मजूर काम करीत असल्याची माहिती रोहयो कक्षातून मिळाली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) जिल्ह्यात ग्रामपंचायत, कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून मजुरांच्या मार्फत काम सुरू आहेत. मागील दोन महिन्यांपासून यात वाढ झाली आहे.

दरम्यानच्या काळात गटविकास अधिकाऱ्यांच्या संपामुळे कामावर परिणाम झाला होता. सध्या संप मिटल्यामुळे पुन्हा एकदा कामांना गती आहे.

जिल्ह्यातील गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतींची २८८१ कामे सुरू आहेत. येथे ३० हजार ७८१ लोकांना रोजगार देण्यात आला आहे. तर कृषी विभागाची ११ कामे सुरू आहेत.

यावर १५८ मजूर काम करीत आहेत. वन विभागाची ६६ कामे सुरू आहेत. या कामावर १२७२ मजूर काम करीत आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागात १६ कामे सुरू आहेत. यावर २७० मजूर काम करीत आहेत.

अशा प्रकारे जिल्ह्यात मागील आठवड्यात २८८१ कामावर ३२ हजार ४८१ मजूर काम करीत आहेत, अशी माहिती रोहयोच्या सूत्राने दिली. सध्या जिल्ह्यात पाणंद रस्ते, सिंचन विहीरी, शेततळे, रोपवाटिका आदी कामे सुरू आहेत.

लोहा तालुक्यात सर्वाधिक ४१४२ मजूर

जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर सर्वांत जास्त लोहा तालुक्यात मजूर कामावर आहेत. या तालुक्यामध्ये ३४५ कामे सुरू आहेत. यावर ४१४२ लोकांना रोजगार देण्यात आला आहे. याशिवाय हदगाव तालुक्यात ३३६ कामे सुरू असून, तेथे ३९१५, कंधार तालुक्यात २३० कामांवर ३१०२ मजूर काम करीत आहेत.

देगलूर तालुक्यात १५३ कामांवर ३०७४ मजूर काम करीत आहेत. माहूर तालुक्यात १९७ कामांवर १९३९, हिमायतनगर तालुक्यात १०६ कामांवर १३८०, नायगाव तालुक्यात ३१८ कामांवर २६९४, मुखेड तालुक्यात १४३ कामांवर १०१६, भोकर तालुक्यात ५९ कामांवर ४५२, धर्माबाद ५५ कामांवर १०९९, अर्धापूर ११८ कामांवर ५२७ मजूर, नांदेड १०० कामावर १३५० मजूर, मुदखेड १४३ कामावर १०१६ मजूर, उमरी १०९ कामांवर १३२५ मजूर, बिलोली ९७ कामांवर १००८ मजूर, किनवट तालुक्यात ३१४ कामांवर २९७९ मजूर कामावर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT