अमरावती : पंतप्रधान सन्मान योजनेतील (PM Sanman Yojna) अनुदानासाठी अजूनही ६१ हजार ९३० शेतकऱ्यांनी ई-केवायसी (Farmer E-Kyc) केली नसल्याने त्यांना या मदतनिधीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. त्यांना अजून २ दिवस मुदत असून, प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आतापर्यंत ई-केवायसी केलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी २३ हजार २१६ अपात्र ठरले आहेत. पंतप्रधान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक अनुदान दिले जाते. त्यासाठी त्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ५२७ शेतकऱ्यांचे बँकखाते आधार संलग्नित आहेत.
त्यातील २ लाख ४५ हजार ५९७ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे. त्याची सरासरी ८० टक्के असली, तरी वीस टक्के शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केली नसल्याने त्यांना मदत मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. ६१ हजार ९३० शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्याचे आढळून आले असून, त्यांना आता १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांपैकी २३ हजार २१६ शेतकरी अपात्र ठरले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक २४०४ शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर सर्वांत कमी शेतकरी २५५ चिखलदरा तालुक्यातील आहेत.
अपात्र ठरलेले तालुकानिहाय शेतकरी
तिवसा २२५०, नांदगाव खंडेश्वर २११४, चांदूररेल्वे १५९०, अंजनगावसुर्जी २३०८, भातकुली २२०८, दर्यापूर १८५३, मोर्शी १२९४, वरुड २२००, धारणी ४०७, चांदूरबाजार १६०३, धामणगावरेल्वे १५६५, अचलपूर २४०४, अमरावती ११६५, चिखलदरा २५५.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.