Nandurbar News : खरीप हंगामातील पिकांसाठी शासनाच्या एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी अवघे पाच दिवस मुदत शिल्लक असून, जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे १५ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला आहे.
त्यात नंदुरबार तालुका अव्वल असून त्यापाठोपाठ अक्रानी, तर सर्वाधिक कमी प्रतिसाद शहादा व तळोदा तालुक्यातून मिळाला आहे.
वास्तविक पाहता या दोन्ही तालुक्यात मोठे बागायतदार शेतकरी असूनही पिक विमा काढण्यात अद्यापही उदासीनता दिसून येत आहे. हवामानातील बदल, वेळीअवेळी पडणारा पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागते. यासाठी शासनाने अवघ्या एका रुपयात पंतप्रधान पीकविमा योजना अंमलात आणली आहे.
या योजनेच्या प्रचार व प्रसार ही मोठ्या प्रमाणावर केला आहे. परंतु शेतकऱ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. ३ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात शहादा व तळोदा तालुका सधन शेतकरी व मोठे बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो.
शेतकऱ्यांची संख्या पाहता अद्यापही या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळाला नाही, असे दिसत आहे. यात विमा काढण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्या दूर झाल्या नाहीत. यातच शेतकऱ्यांची अनास्था आहे की तांत्रिक समस्या हादेखील प्रश्न आहे. शहादा तालुक्यात या योजनेला शेतकऱ्यांच्या संख्येच्या मानाने कमी प्रतिसाद मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख सहभागी
जळगाव जिल्ह्यात नाशिक विभागातून सर्वाधिक साडेतीन लाख शेतकरी खरिपातील पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. यंदा ही संख्या वाढली असून, काही शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे योजनेत सहभागी होवू शकले नाहीत. सर्वाधिक विमा संरक्षण कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी घेतले आहे. तसेच सोयाबीनसाठी व कांदा पिकालाही अनेकांनी विमा संरक्षण घेतले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.