government Aid Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Government Funds : वंचित नुकसानग्रस्तांसाठी १३५ कोटींचा निधी वितरणास मंजुरी

हिंगोली, परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १ लाख ३८ हजार ८९२ बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत करण्याकरिता १३५ कोटी ६१ लाख ९ हजार रुपये निधी वितरणास राज्यशासनाने गुरुवारी (ता. १३) काढलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे.

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः अतिवृष्टीच्या (Heavy Rainfall) निकषाबाहेरील, परंतु यंदाच्या जून ते ऑगस्ट महिन्यातील सततच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीबद्दल (Crop Damage) विशेष बाब म्हणून हिंगोली, परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १ लाख ३८ हजार ८९२ बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत करण्याकरिता १३५ कोटी ६१ लाख ९ हजार रुपये निधी वितरणास राज्यशासनाने गुरुवारी (ता. १३) काढलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सततच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या चार तालुक्यांतील एकूण ९६ हजार ६७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसानीबद्दल १ लाख ३४ हजार ४०६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु राज्य आपत्ती निवारण बल (एसडीआरएफ) निकषात बसत नसल्यामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित होते.

विविध भागांतील शेतकरी आंदोलनानंतर विशेष बाब म्हणून या वंचित बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १३२ कोटी १४ लाख ९४ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली. त्यात जिरायती क्षेत्रातील ९६ हजार १७८ हेक्टर पिकांच्या नुकसानीबद्दल १३० कोटी ८० लाख २१ हजार रुपये, बागायतील क्षेत्रातील ४९९ हेक्टरवरील पिकांसाठी १ कोटी ३४ लाख ७३ हजार रुपयांचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यातील परभणी आणि जिंतूर या दोन तालुक्यांतील २ हजार ५४५.२५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झालेल्या ४ हजार ४८६ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये निधी वितरणात मंजुरी देण्यात आली आहे.

जिरायती क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांनुसार, तर बागायती क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २७ हजार रुपयांनुसार ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल. मदतीची रक्कम बँक खात्यावर जमा केली जाईल.

सततच्या पावसामुळे बाधितांसाठी

मंजूर निधी रक्कम (कोटी रुपये)

तालुका बाधित क्षेत्र शेतकरी संख्या रक्कम

हिंगोली २७०९५ ४९१२६ ३६.८४

कळमनुरी २५३०६ २३८१२ ३५.०८

औंढा नागनाथ २९४५० ४३२०६ ४०.०५

सेनगाव १४८२६ १८२६२ २०.१६

परभणी २१३८ ४१९९ २.९०

जिंतूर ४०७ २८७ ०.५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT