Moringa Production Agrowon
इतर

निर्यातक्षम शेवगा उत्पादन तंत्र आणि निर्यातीच्या संधी

दोन दिवसीय कार्यशाळेत शनिवारी, रविवारी मार्गदर्शन

Team Agrowon

पुणे : पूर्वी बांधावरचे पीक म्हणून ओळख असलेल्या शेवगा पिकाला आता व्यापारीदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेवगा लागवडीचा कल वाढला आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय शेवग्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातीसही चांगली संधी आहे.

निर्यातक्षम शेवगा उत्पादन कसे घ्यावे, कोणकोणत्या देशात निर्यातीला संधी आहेत, या बाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी दोन दिवसांची कार्यशाळा शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होत आहे.

कमी पाण्यात व कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवगा पिकाची लागवड कशी करावी, शेवग्याच्या वेगवेगळ्या जातींची ओळख, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणीचे व्यवस्थापन, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायन मुक्त उत्पादन, ट्रेसिबिलीटी, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम आदी संदर्भात निर्यातदार तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार पाचशे रुपये.
- संपर्क ः ९१४६०३८०३१.
- कार्यशाळेचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT