शेवगा, हादगा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Anil Jadhao 

अन्नासाठी विशेषतः भाजीसाठी उपयोग होतो, असे दोन महत्वाचे वृक्ष म्हणजे हदगा आणि शेवगा. प्राचीन वाङ्‌मयात हदगा-शेवगा यांचे महत्व सांगितलेले आहे. पूर्वी प्रत्येकाच्या परसदारी हदगा-शेवगा ही जोडी असायचीच. त्याला कारणही तसेच आहे. या दोन्हीही गुणी वृक्षांची पाने, फुले, फळे, खोड अशी प्रत्येक गोष्ट अत्यंत उपयुक्त आहे. शेवग्याच्या पाने-फुले-फळांची भाजी बनवून खाल्ली जाते. (सर्व छायाचित्रे ः निलिमा जोरवर)

Agrowon

हदग्याच्या फुलांचीही भाजी खूपच रुचकर आणि सारक असते. हदग्याच्या फुलांची भजी पण छान होतात आणि कोवळ्या शेंगांची भाजी उत्तम होते. हदग्याचे औषधी गुणधर्म पाहिले तर या झाडाचे महत्व लक्षात येईल.

Agrowon

हदगा हे उष्णतारोधी आहे. भरपूर ‘अ’ जीवनसत्व व इतर पोषकद्रव्ये त्यात आहेत. त्यामुळे ॲनिमिया, उष्णता, ताप, अर्धशिशी, तोंड येणे, घशाला कोरड पडणे इ. अनेक आजारांवरील औषधांत त्याचा उपयोग होतो. तसेच टॉनिक बनविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. ट्युमर, कॅन्सरसारख्या आजारांतही त्याचा उपयोग होतो.

Agrowon

शेवग्याच्या झाडाचे मूळ भारतात आणि आफ्रिका खंडात सापडते. आयुर्वेदानुसार ३०० प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून शेवग्याचा उपयोग होतो. मधुमेह, मुतखडा यापासून ते हृदयरोग, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांमध्येही त्याचा प्रभावी उपयोग होतो.

Agrowon

शेवग्याची पाने, फुले, फळे, बिया इ. सर्वच गोष्टी खाद्य म्हणून उपयोगात येतात. साल आणि मूळ यांचा उपयोग औषधांत होतो. यांचे तंतू काढता येतात. बियांपासून निघणारे ‘बेन ऑइल’ हे ऑलिव्ह ऑइल इतकेच महत्वाचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शेवग्यापासून मिळणारे पोषकतत्त्वे.

Agrowon

शेवग्यामध्ये संत्र्यापेक्षा सात पट अधिक जीवनसत्व ‘क’ आहे. दुधापेक्षा चौपट कॅल्शियम आहे. गाजरापेक्षा चौपट जीवनसत्व ‘अ’ असते. दुधापेक्षा दुप्पट प्रथिने आणि केळीपेक्षा तिप्पट पोटॅशियम असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon