उसासाठी योग्य ठिबक सिंचन
ठिबक सिंचन पद्धतीची निवड कमी कालावधीमध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रिपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कमी अंतराने (म्हणजेच दरदिवशी अथवा एक दिवसाआड) कमी प्रवाहाने मात्र जास्त कालावधीसाठी पाणी देणे फायद्याचे असते. त्यामुळे जमिनीमध्ये पिकांच्या मुळांशी पाण्याचे अपेक्षित व योग्य प्रकारे उभे-आडवे प्रसरण होते. मुळांची वाढ चांगली खोलवर होते. परिणामी जोमदार वाढ होऊन भरीव उत्पादन मिळते. यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन यंत्रणेची निवड करावी. उसासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतीच्या निवडीसाठी मार्गदर्शक सूचना ः
जमिनीचा प्रकार | शिफारशीत ठिबक सिंचन प्रणाली | दोन ठिबक नळ्यातील अंतर (मी.) | दोन ड्रिपरमधील अंतर (मी.) | ड्रिपरचा प्रवाह (लिटर/तास) |
उथळ कमी खोलीची जमीन | पृष्ठभागावरील ठिबक १६ मि.मी. इनलाइन | १.३५ | ०.३० | १ |
मध्यम खोलीची जमीन | पृष्ठभागावरील / पृष्ठभागाखालील ठिबक १६ मि.मी. इनलाइन/१२ मि.मी. इनलाइन | १.५० | ०.४० | १ / १.६ /२ |
जास्त खोलीची काळी जमीन | पृष्ठभागावरील / पृष्ठभागाखालील ठिबक १६ मि.मी. इनलाइन/१२ मि.मी. इनलाइन | १.८० | ०.५० | १.६ / २ |
चढ उताराची जमीन | पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रिपर असणारी १६ मि.मी. /१२ मि.मी. इनलाइन ठिबक | १.५० | ०.४० | १ / १.६ |
विविध ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात प्रवाह मिळण्यासाठी व सलग एकसारखी अपेक्षित ओल निर्माण करण्यासाठी नळ्यांची (लॅटरल) लांबी दर्शवणारा तक्ता ः
ठिबक पद्धती | दोन ड्रिपरमधील अंतर (सें. मी.) | ड्रिपरचा प्रवाह (लिटर / तास) | ठिबक नळीची लांबी (मी.) | ड्रिपरचा प्रवाह (लिटर / तास) | ठिबक नळीची लांबी (मी.) | ड्रिपरचा प्रवाह (लिटर/तास) | ठिबक नळीची लांबी (मी.) |
पृष्ठभागावरील ठिबक १६ मि.मी. इनलाइन | ५० | १ | १३७ | २ | ८८ | ३ | ६८ |
४० | १ | ११६ | २ | ७४ | ३ | ५७ | |
३० | १ | ९३ | २ | ५९ | ३ | ४६ | |
पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रिपर असणारी १६ मि.मी. इनलाइन ठिबक | ५० | १ | १८७ | १.६ | १३७ | २ | ११९ |
४० | १ | १५७ | १.६ | ११५ | २ | ९९ | |
३० | १ | १२४ | १.६ | ९१ | २ | ७८ | |
पृष्ठभागावरील ठिबक १२ मि.मी. इनलाइन | ५० | १ | ८४ | १.९ | ५४ | २.८५ | ४२ |
४० | १ | ७१ | १.९ | ४५ | २.८५ | ३५ | |
३० | १ | ५६ | १.९ | ३६ | २.८५ | २८ | |
पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रिपर असणारी १२ मि.मी. इनलाइन ठिबक | ५० | १ | ९६ | १.६ | ८८ | २ | ७६ |
४० | १ | ८२ | १.६ | ७२ | २ | ६२ | |
३० | १ | ६५ | १.६ | ५६ | २ | ४८ |
जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती (सबसरफेस ड्रिप) उसासारख्या दीर्घायुषी पिकासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन (अर्थात सबसरफेस ड्रिप सिस्टिम) अतिशय योग्य आहे. या पद्धतीमध्ये पाणी व खते थेट ऊस पिकाच्या मुळाजवळ दिली जातात. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. ऊस वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये पाणी व खताच्या कार्यक्षम वापरामुळे ऊस उत्पादनात व साखर उताऱ्यात भरीव वाढ होते. या पद्धतीखाली उत्तम व्यवस्थापन केल्यास उसाचे एक लागवड पीक व कमीत कमी चार खोडवा पिके अतिशय उत्तमरीत्या घेता येतात. परिणामी एकूणच ऊस उत्पादन खर्च कमी होतो. निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते. पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती कशी काम करते? पाण्याचा जमिनीतील प्रवाह हा मुख्यत्वे केशाकर्षण (कॅपिलरी) दाबामुळे नियंत्रित केला जातो. हा दाब सर्व दिशांना सारखा असतो आणि गुरुत्वाकर्षणाचा दाब हा स्थिर व खालच्या दिशेला असतो. जशी जमीन ओली होते, तसा कॅपिलरी दाब कमी होत जातो. कोरड्या जमिनीत कॅपिलरीचा दाब हा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापेक्षा जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सर्व दिशांना सारखा असतो. जेव्हा जमीन ओली होत जाते, तेव्हा जमिनीतील सर्व पोकळ्यांमध्ये पाणी भरल्याने कॅपिलरी दाब कमी होतो व गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वाढतो आणि पाण्याचा प्रवाह उताराच्या बाजूला सुरू होतो. या साध्या मूलतत्त्वामुळे हलके पाणी दिले तर कॅपिलरी दाबाने त्यावर नियंत्रण ठेवता येते. पाण्याची कार्यक्षमता वाढवता येते. पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे ः
सबसरफेस ठिबक नळी जमिनीत गाडताना घ्यावयाची काळजी ः
पृष्ठभागाखालील ठिबक सिंचनासाठी योग्य ड्रिपलाइनची निवड
देखभाल -महिन्यातून एकदा न चुकता ड्रिपलाइन फ्लश कराव्यात, ज्यामुळे त्यात साठलेली घाण निघून जाईल. ड्रिपलाइन फ्लश करण्याअगोदर सबमेन फ्लश करून घ्याव्यात. -पाणी परीक्षण अहवालानुसार आम्ल प्रक्रिया करावी. अरुण देशमुख, ९५४५४५६९०२ (सह सरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.