Village Agrowon
मुख्य बातम्या

गावांना लोकसहभागातून प्रगतीकडे घेऊन जायचे - प्रतापराव पवार

पानवडी (ता. पुरंदर) गावाप्रमाणेच ८५० पेक्षा जास्त गावांमध्ये(Village) ‘सकाळ(Sakal) रिलीफ फंडा’च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली आहेत. आणखी सुमारे १५० गावांमध्ये अशा पद्धतीची कामे सुरू आहेत.

टीम ॲग्रोवन

गराडे, जि. पुणे : ‘‘पानवडी (ता. पुरंदर) गावाप्रमाणेच ८५० पेक्षा जास्त गावांमध्ये(Village) ‘सकाळ(Sakal) रिलीफ फंडा’च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली आहेत. आणखी सुमारे १५० गावांमध्ये(Village) अशा पद्धतीची कामे सुरू आहेत. या गावांना लोकसहभागातून प्रगतीकडे घेऊन जायचे आहे. त्यासाठी गावाचा सहभाग यात असणे गरजेचे असते,’’ अशी माहिती ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिली.

पानवडी येथे ‘सकाळ माध्यम समूह’, सायन्स टेक्नॉलॉजी पार्क, टास्क कोफो, मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने महिला सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत पानवडी बोटिंग क्लबचे उद्‍घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते मंगऴवारी (ता.२९) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पानवडी येथील काही महिला दहा वर्षांपूर्वी मला भेटायला आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी गावच्या(Villlage) समस्या मांडल्या. त्यानंतर काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या गावचा विकास करण्याचे ठरवले. गाव पाण्याचा(Water) योग्य वापर करत आहे. त्यामुळे गावाची प्रगती होताना दिसत आहे.’’

या वेळी सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे अध्यक्ष दिलीप बंड, महासंचालक राजेंद्र जगदाळे आणि टास्क कोफो, मुकुल माधव फाउंडेशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पर्यटकांसाठी स्वच्छता व नागरिकांचे राहणीमान चांगले असणे गरजेचे आहे. त्यातून आपल्या गावाचा सर्वोत्तम विकास(Devlopment) होऊ शकतो. तसेच नवनवीन उद्योग व व्यवसायातून तरुणांना पुढे जाता येईल.
प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दर दबावातच, आले दर टिकून, मेथी भाजी तेजीत, लिंबाचे दर स्थिर तर संत्र्याला उठाव

Oil Seed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर राहण्याची शक्यता

Ativrushti Madat: शेतकऱ्यांना ६४८ कोटी रुपये मिळणार; २३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर 

Cooperative Bank: जिल्हा बँकेच्या ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम’ सेवेला सुरुवात

Monsoon Rain Update: ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

SCROLL FOR NEXT