Voter turnout in Punjab shocking for Congress - Pawar 
मुख्य बातम्या

पंजाबमधील मतदारांचा कौल काँग्रेससाठी धक्कादायक - पवार

येत्या काळात देशात प्रभावशाली राजकीय पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले आहेत. येत्या १४ मार्चपासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार असून त्यादरम्यान सर्व विरोधी पक्षाचे सदस्य दिल्लीत उपस्थित असणार आहेत. त्यावेळी पुढील रणनीतीबाबत चर्चा होऊ शकते, असेही पवार यांनी नमूद केले आहे.

टीम अॅग्रोवन

पंजाबमधील मतदारांनी दिलेला कौल हा काँग्रेससाठी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली आहे.   उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarkhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2022) निकाल गुरुवारी (१० मार्च) जाहीर झाले. या निकालांवर भाष्य करताना पवार यांनी, लोकशाहीत जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याचा सन्मान करण्याची गरज व्यक्त केली.

व्हिडीओ पहा- 

पंजाबमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता होती, मात्र तिथे मतदारांनी आम आदमी पक्षासारख्या (Aam Aadmi Party) प्रादेशिक पक्षाला कौल दिला. आप हा अलीकडील काळात तयार झालेला राजकीय पक्ष आहे. दिल्लीत त्या पक्षाची सत्ता आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत या पक्षाने सातत्याने यश मिळवले, ज्या प्रकारे प्रशासन दिले त्याचा प्रभाव पंजाबमध्ये झाला आहे.

येत्या काळात देशात प्रभावशाली राजकीय पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले आहेत. येत्या १४ मार्चपासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार असून त्यादरम्यान सर्व विरोधी पक्षाचे सदस्य दिल्लीत उपस्थित असणार आहेत. त्यावेळी पुढील रणनीतीबाबत चर्चा होऊ शकते, असेही पवार यांनी नमूद केले आहे.

पंजाब वगळता अन्य ठिकाणी लोकांनी आहे त्या सरकारला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातील सकारात्मक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'अभी महाराष्ट्र बाकी है' च्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, या प्रतिक्रियेवर पवार यांनी 'तो महाराष्ट्र भी तयार है' असे स्पष्ट करत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT