ममता बनर्जी 
मुख्य बातम्या

वीरभूम हिंसाचार प्रकरण सीबीआयकडे

राज्य पोलिसांना या प्रकरणाचा तपास करता येणार नाही आणि याप्रकरणाशी संबंधित पुरावे आणि कागदपत्रे सीबीआयकडे तातडीने सुपूर्द करावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

टीम अॅग्रोवन

वीरभूम/कोलकता: पश्‍चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. यासंदर्भात कोलकता उच्च न्यायालयाने आज आदेश दिले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य पोलिसांकडून अपेक्षेप्रमाणे तपास झाला नाही, असे उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आणि अन्य याचिकांची न्यायालयाने(Court) स्वत:हून दखल घेतली. एसआयटीच्या(SIT) तपासातील त्रुटी न सांगता यापुढे राज्य पोलिसांना या प्रकरणाचा तपास करता येणार नाही आणि याप्रकरणाशी संबंधित पुरावे आणि कागदपत्रे सीबीआयकडे (CBI)तातडीने सुपूर्द करावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. येत्या ७ एप्रिलपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानंतर सीबीआयचे पथक रामपूरहाट येथे दाखल झाले.

हे हि पहा : 

कोलकता उच्च न्यायालयाचे(High Court) मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव आणि न्यायाधीश राजश्री भारद्वाज यांच्या पीठाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश दिला. तसेच पुढील तपासात एसआयटीने सीबीआयला मदत करावी, असेही निर्देश दिले. वीरभूम जिल्ह्यात बोगतुई येथे २२ मार्चला घरांना आगी लावल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. बोगतुई येथील एका तृणमूल कॉंग्रेस नेत्याची हत्या झाल्यानंतर हिंसाचार उसळला होता. मृतांत तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. तसेच नवविवाहित जोडप्याचाही यात समावेश होता. न्यायवैद्यकीय चाचणीत धक्कादायक निष्कर्ष आले असून पीडितांना अगोदर धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली आणि नंतर पेटवून देण्यात आल्याचे म्हटले आहे. बेशुद्ध होईपर्यंत जमावाने पीडितांना मारहाण केल्याचेही अहवालात नमूद केले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी बोगतुई गावातील लोकांना हुसकावून लावले. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आणि बंगाल सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची नियुक्ती केली. आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing: अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीची पेरणी ७५ टक्के

VNMKV Research Park: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रिसर्च पार्क प्रस्तावित

Flood Damage Issues: माढ्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

Farmer Crisis: कापसावर बोंडअळीचे आक्रमण; शेतकरी संकटात

Mulberry Cultivation: सांगली जिल्ह्यात ५९३ एकरांवर तुती लागवड

SCROLL FOR NEXT