PM-KISAN Agrowon
मुख्य बातम्या

PM-KISAN : पीएम किसानचा १४ हप्ता जमा, महाराष्ट्रातील ८५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २-२ हजार

PM-KISAN 14th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील ८ कोटी ५० कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १७ हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर १ हजार ८६६.४० कोटी रुपये जमा झाले आहेत.

Team Agrowon

PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता गुरुवारी, २७ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील ८.५ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १७००० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला १ लाख २५ हजार पीएम किसान समृद्धी केंद्रे सुपूर्द केली आहेत. याशिवाय गव्हर्नमेंट अॅग्रीगेटर अॅपवर १६०० FPO चाही समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत, नरेंद्र मोदी सरकारने PM किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण २.५० लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

पीएम किसान योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी २०२३ मध्ये मिळाला होता. ५ महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात १४ वा हप्ता जमा झाला आहे. तर १२ वा हप्ता ऑक्टोबर २०२२ मध्ये दिला. मे २०२२ मध्ये शेतकऱ्यांना ११ व्या हप्त्याचा लाभ मिळाला होता.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना हप्त्याने दिले जातात. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. ही योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या नोंदी पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. यासोबतच ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही. त्यांना १४ व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.



https://pmkisan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर, येथे दिलेल्या फॉर्मर कॉर्नरवर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थी स्टेट्सवर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. या नवीन पेजवर तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि १० अंकी मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. मग तुम्हाला तुमचे स्टेट्स दिसेल.

या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा

सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल. त्याचे स्टेट्स  जाणून घेण्यासाठी तुम्ही 155261 वर कॉल करू शकता. यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT