soybean  
मुख्य बातम्या

Soybean Price: देशातील सोयाबीन बाजार स्थिर

खाद्यतेल दरवाढीमुळे सोयाबीन एक भावपातळीभोवती फिरत आहे. आजही देशातील बाजारात सोयाबीन तेजीत होते. मंगळवारी देशात सोयाबीनला ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळला.

अनिल जाधव

पुणेः यंदा देशातून सोयापेंड (Soymeal) निर्यात घटली, असं सोपानं स्पष्ट केलंय. मात्र खाद्यतेल (Edible oil) दरवाढीमुळे सोयाबीन एक भावपातळीभोवती फिरत आहे. आजही देशातील बाजारात सोयाबीन (Soybean) तेजीत होते. मंगळवारी देशात सोयाबीनला ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळला. सोयाबीन हंगाम ऑक्टोबरपासून सुरु झाला. हंगाम सुरु होऊन पाच महिने झाले. मात्र बाजारातील सोयाबीन आवक (Soybean Arrival) कमीच आहे, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थात सोपाने (SOPA) म्हटले आहे. सोपाच्या मते फेब्रुवारीपर्यंत देशातील बाजारांत ५५ लाख टन सोयाबीन बाजारात आले. मागील हंगामात याच काळात ७० लाख टन सोयाबीन विक्री झाली होती. बाजारात आवक कमी झाल्याने गाळपही घटले. यंदा सोयाबीन गाळप ३७ टक्क्यांनी कमी झाले. मागील हंगामात याच काळात ५४ लाख टनांचे गाळप झाले होते. मात्र यंदा केवळ ३४ लाख टन सोयाबीनवर प्रक्रिया झाली. हे ही वाचाः खाद्याच्या दरवाढीमुळे पोल्ट्री उद्योग मेटाकुटीला

सोयापेंडची निर्मितीही हंगामाच्या अगदी सुरुवातीपासूनच कमी राहिली. आत्तापर्यंत २७ लाख टन सोयापेंडेची देशात निर्मिती झाली. मागील हंगामाच्या तुलनेत सोयापेंड निर्मिती ३७ टक्क्यांनी कमी राहिली. मागील वर्षी पहिल्या पाच महिन्यांत ४३ लाख टन सोयापेंड उत्पादन झालं होतं. सोयापेंड निर्मितीत मात्र यंदा ६९ टक्क्यांनी घट झाली. मागील हंगामात १३.५५ लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती. मात्र यंदा केवळ ४.२३ लाख टन सोयापेंड विदेशात गेली. यंदा सोयापेंड निर्यात घटली मात्र मानवी आहारात सोयाबीनचा वापर वाढला. मानवी आहारातील सोयाबीन वापर ३५ टक्क्यांनी वाढला. तसेच सोयातेलासाठी सोयाबीनला मागणी वाढली आहे. याचा परिणाम दरावर झाला. सध्या दर एका भावपातळीभोवती फिरत आहेत. मंगळवारी देशात सोयाबीनला ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळला. हे ही वाचाः अर्जेंटीनाच्या सुर्यफूल तेलाच्या किमतीत ४७ टक्क्यांनी वाढ मध्य प्रदेशचा विचार करता सोयाबीन आवक ३० हजार क्विंटल होती. या सोयाबीनला सर्वसाधारण दर ७ हजार ३०० रुपये राहिला. तर प्लांट्सचे दर सरासरी ७ हजार ५५० रुपये होते. महाराष्ट्रातही सोयाबीनची आवक जवळपास ३० हजार क्विंटल राहिली. तर बाजार समितीत सर्वसाधरण दर ७ हजार रुपयांचा होता. कमाल दर ७ हजार ५०० रुपये मिळाला. तर प्लांट्सचा दर सरासरी ७ हजार ४०० रुपये राहिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT