SKM refuses to nominate members for Centre's MSP committee, seeks clarifications  
मुख्य बातम्या

कायदा होणार असला तरच एमएसपी समितीला अर्थ !

एमएसपी समितीच्या शिफारशी लागू करण्याचं बंधन सरकारवर नसेल तर त्या समितीला काय अर्थ आहे? असा सवाल उपस्थित करत संयुक्त किसान मोर्चानं या समितीवरील आपली संभाव्य नावं सुचविण्यास नकार कळवलाय. या समितीचं स्वरूप, तिचा अध्यक्ष व अन्य सदस्य कोण असणार? समितीला वैधानिक दर्जा असणार काय? याबाबतचा लेखी खुलासा केल्याशिवाय आपण कुठल्याही समितीत सहभागी होणार नसल्याचं संयुक्त किसान मोर्चाच्या सुकाणू समितीचे सदस्य युद्धवीर सिंग यांनी सरकारला सांगितलं आहे.

Team Agrowon

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव (MSP) मिळायला हवा. त्यासाठी हमीभावाचा कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी वर्षभर आंदोलन करून केंद्र सरकारला नरमाईची भूमिका घ्यायला भाग पाडणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने एमएसपी (MSP) समितीवरील सदस्यांची नावं कळवायला नकार दिलाय, ही बातमी तशी आश्चर्यजनक वाटू शकते. मात्र यामागील संयुक्त किसान मोर्चाची भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे.

केंद्र सरकार जोवर या समितीचं स्वरूप, तिचं उद्दिष्ट, अध्यक्ष व अन्य सदस्यांची नावं स्पष्ट करत नाही तोवर संयुक्त किसान मोर्चाकडून आपली नावं पाठवणार नसल्याचं मोर्चाच्या सुकाणू समितीचे सदस्य युद्धवीर सिंग यांनी स्पष्ट केलंय. २२ मार्च रोजी एमएसपी (MSP) समितीसाठी २ ते ३ नावे सुचवण्यासाठी आपल्याला केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून फोन करण्यात आला होता. मात्र आपण त्यास नकार दिल्याचं युद्धवीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.

या समितीचं स्वरूप स्पष्ट झालं पाहिजे, तिचं उद्दिष्ट काय, अध्यक्ष व अन्य सदस्य कोण असणार ? याशिवाय या समितीच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक असणार की ही समिती अन्य शिफारस समित्यांप्रमाणे केवळ शोभेची ठरणार ? याबाबतची लेखी हमी मिळाल्याशिवाय संयुक्त किसान मोर्चा कुठल्याही समितीवर सदस्यांची नावं सुचवणार नसल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT