Is the Russia-Ukraine war causing a global food crisis?
Is the Russia-Ukraine war causing a global food crisis? 
मुख्य बातम्या

कोणत्या देशांना बसतोय युद्धाचा सर्वाधिक फटका ?

टीम अॅग्रोवन

रशिया-युक्रेन संघर्षामुळे जगभरात अन्नधान्याचे संकट (food crisis) निर्माण होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात जागतिक खाद्याच्या वाढलेल्या किमतीवरून या संकटाची तीव्रता लक्षात येते आहे.  फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या मते ((FAO) फूड कमोडिटीजच्या वाढत्या किमतीमुळे विशेषतः गव्हाच्या (wheat) वाढत्या किमतीमुळे जगातील काही लाख नागरिकांना याची झळ बसू शकते.

गहू, मका आणि खाद्यतेलाच्या किमतीत दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वाधिक दरवाढ पहायला मिळाली आहे. तर कच्या तेलाचे (Raw oil) दर प्रती बॅरल १०० डॉलरने वाढल्यामुळे त्याच फटका कृषी क्षेत्रातील रसायनांच्या दरवाढीला बसू शकतो.  

हेही पाहा-  रशिया, युक्रेन वादाचे Agriculture Commodity Market मध्ये पडसाद

रशिया (Russia) हा जगातील प्रमुख गहू निर्यातदार (Exporter) आहे तर युक्रेनसुद्धा जगातील पहिल्या पाच गहू निर्यातदार देशांपैकी एक आहे. या दोन्ही देशांकडून येणाऱ्या गव्हाच्या आयातीवर विसंबून असलेल्या देशांमध्ये गव्हाची दरवाढ पहायला मिळते आहे.  गव्हाखेरीज युक्रेन हा मक्याचाही मोठा निर्यातदार देश आहे. जगातील एकूण मका निर्यातीचा १७ टक्के निर्यात एकट्या युक्रेनमधून (Yukrain) केली जाते. तर जगातील सूर्यफूल तेलाच्या निर्यातीतील ६० टक्के सूर्यफूल तेलाची निर्यात युक्रेनमधून केली जाते. 

२४ फेब्रुवारी रोजी रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटले आणि गव्हाच्या किमतीत ५० टक्क्यांची दरवाढ झाली, मक्याच्या किमतीत २५ टक्क्यांची, सूर्यफूल तेलाच्या किमतीत ३५ टक्क्यांची आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ झालीय. केवळ खाद्याच्या नव्हे तर पशुखाद्याच्या किमतीही वाढल्या आहेत. 

मका (Maize)आणि बार्लीच्या (Barley) किमती गगनाला भिडल्या आहेत.  जगातील मका आणि बार्लीच्या निर्यातीतील १४ टक्के निर्यात ही रशिया आणि युक्रेनमधून होते.  अन्नधान्याच्या या दरवाढीचा फटका बसून आपल्या देशातील नागरिकांची उपासमार होता कामा नये, यासाठी प्रत्येक देश अत्यावश्यक कृषी उत्पादनांचा साठा करून ठेवायला लागले आहेत. 

हंगेरीने धान्याची निर्यात बंद केली आहे, मोल्दोवा या छोट्या निर्यातदार देशानेही गहू, मका आणि साखरेची निर्यात करणे थांबवले आहे. अर्जेंटिनानेही देशांतर्गत गव्हाच्या पुरवठ्याची सोय करत पास्त्याचे दर नियंत्रणात राहतील, याची काळजी घेतली आहे. खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्याने इंडोनेशियाने देशांतर्गत पाम तेल उत्पादन २० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आणले आहे. 

बल्गेरिया या कृषी उत्पादनांच्या निर्यातदार देशाने अंतर्गत गरजा भागवण्यावर भर द्यायचा निर्णय घेतलाय. इजिप्तनेही गहू, डाळींची निर्यात थांबवून आवश्यक कृषी उत्पादनाचा पुरेसा साठा करून ठेवायला सुरुवात केलीय. 

जगातल्या प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांच्या उपासमारीची भीती लागून राहिलीय त्यामुळे ते सर्वसामान्य परिस्थितीत करत असलेली कृषी उत्पादनांची निर्यात थांबवण्यावरच भर देत असल्याचं  नमूद केलंय . गहू, खाद्यतेल, मक्यासाठी रशिया आणि युक्रेनमधील आयातीवर विसंबून असलेल्या आफ्रिकन आणि पश्चिम आशियायी देशांना आता चढ्या दराने या कमोडिटीजची खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी पर्यायी बाजारपेठ शोधावी लागणार आहे. या कमोडिटीज खरेदीसाठी त्यांना आता अधिकतम पैसे मोजावे लागणार आहेत. 

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे सर्वाधिक फटका बसलाय तो मागास समजल्या जाणाऱ्या आफ्रिका आणि आशियायी देशांना.इजिप्त, इराण, तुर्की आणि बांग्लादेश हे देश युक्रेन आणि रशियामधून येणाऱ्या गव्हाच्या पुरवठ्यावर अवलंबून असतात.  लेबनान, ट्युनिशिया येमेन, लिबिया, पाकिस्तान या देशांचीही खाद्यान्न गरज सोव्हिएत रशियन परिवारातील सदस्य देशांकडून होणाऱ्या निर्यातीवर भागत असते. केवळ अन्नधान्याच नव्हे तर रशियन खतांच्या पुरवठ्यावर निर्भर असलेल्या देशनाही याचा फटका बसत असल्याचं  FAO ने म्हटलं आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाची गळती निघणार तरी कधी? ८० कोटी निधीचं काय झालं

Agriculture Technology : ‘सच्छिद्र निचरा’ तंत्रामुळे जमीन झाली क्षारपडमुक्त

Automatic Farming Machinery : स्वयंचलित यांत्रिकीकरणाची वाढवावी लागेल गती

Panchaganga Pollution : मैला, रक्त, काळे फेसाळलेले थेट पाणी पंचगंगा नदीत, प्रदुषण मंडळाकडून पाण्याची चाचणी

Electoral Process : निवडणूक प्रक्रियेत बदलावर करा विचार

SCROLL FOR NEXT