हवामानशास्त्र विभागाकडून एप्रिल महिन्यासाठीचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आलाय. siraphol s.
मुख्य बातम्या

एप्रिलमधील ऊन-पावसाचा हवामान अंदाज हा असा आहे!

हवामानशास्त्र विभागाकडून एप्रिल महिन्यासाठीचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात पाऊस आणि तापमानाची स्थिती कशी राहील, वाचा सविस्तर.

Mayur Girhe

पुणे : भारतीय हवामानशास्त्रीय विभागाने आज (ता. ३१) एप्रिल महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला. विभागाने (IMD) जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार वायव्य आणि मध्य भारतात बहुतांश ठिकाणी तर इशान्य भारतात काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यातही विदर्भासहित उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासाठी एप्रिल महिना चांगलाच उकाड्याचा ठरेल, असे दिसते. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तापमान राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कमी राहण्याची चिन्हे आहेत. मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची शक्यता विभागाने यापूर्वीच वर्तवली होती.

“हवामानशास्त्र विभागाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा मध्य भारतात मोडतो. विभागाच्या अंदाजानुसार राज्यात एप्रिलमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या काळात तापमान चढेच राहण्याची शक्यता दाट आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात एप्रिल महिन्यात हलका पाऊसही पडू शकतो,”
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

दुसरीकडे दक्षिण भारतात आणि पूर्व आणि इशान्य भारताच्या बऱ्याच भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. तर किमान तापमान देशाच्या वायव्य, मध्य, आणि इशान्येकडील राज्यांच्या बहुतांश भागांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा हवामानशास्त्र विभागाचा होरा आहे. परिणामी, महाराष्ट्रात दिवसाप्रमाणेच रात्रीही उकाड्याच्या असू शकतात. दक्षिण भारत, मध्य भारताचा पूर्वेकडील भाग, आणि इशान्य भारताचे दक्षिणेकडील भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी असू शकते.

एकूण देशाचा विचार करता एप्रिलमध्ये देशभरात सरासरीइतका पाऊस पडू शकतो, असे विभागाने म्हटले असून महाराष्ट्रात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल. मुळात एप्रिलमध्ये होणाऱ्या पावसाचे प्रमाण नगण्य असल्याने अगदी काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आलेली उष्णतेची लाट कायम राहील, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने ट्विट करून दिली आहे.

महासागर जमिनीच्या तुलनेत लवकर थंड अथवा गरम होत नाहीत. त्यामुळे, जगातील सर्वच भूखंडांप्रमाणे भारतीय उपखंडावर महासागरांच्या तापमानाचा कमालीचा प्रभाव पडत असतो. त्यातील प्रशांत महासागरात सध्या असलेली ‘ला निना’ स्थिती भारतीय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. ही ला निना स्थिती एप्रिलमध्ये कायम राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे अमेरिका खंडातील काही देशांमध्ये असलेली दुष्काळी परिस्थिती कायम राहील, असे दिसते. परिणामी, तेथील सोयाबीन आणि मक्यासारख्या पिकांचे उत्पादन कमी होऊन भारतीय शेतमालाच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT