farmers  
मुख्य बातम्या

शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प उपयुक्त नाही- तोमर 

लोकसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तोमर यांनी कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प (separate budget)ही संकल्पना शेतकरी, देशाच्या हिताची नसल्याचे स्पष्ट केले आहे.

टीम अॅग्रोवन

शेती आणि शेतकऱ्यांच्या हितसंबंधांप्रती सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत केंद्रीय कृषी व शेतकारी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाचा (separate budget) मुद्दा फेटाळून लावला आहे. 

लोकसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तोमर यांनी कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प (separate budget) ही संकल्पना शेतकरी, देशाच्या हिताची नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

लोकसभेत मंगळवारी द्रविड मुन्नेत्र कळघमचे (डीएमके) सदस्य टी. आर. बालू यांनी कृषी क्षेत्रासमोरील प्रश्नांच्या निवारणासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची (separate budget) तरतूद करण्याचा विचार का करत नाही ?  असा सवाल उपस्थित केला. 

 जगभरातील मंदीच्या काळात भारताने केवळ कृषी क्षेत्राच्या जोरावरच तग धरलेला आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तामिळनाडू सरकारने कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प (separate budget)  मांडल्याचेही बालू म्हणाले.  

बालू यांनी केलेली सूचना नैसर्गिकपणे स्वागतार्ह वाटू शकते. प्रत्यक्षात शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प (separate budget) ही कल्पना देशाच्या आणि शेतकऱ्यांच्याही कामाची नसल्याचे कृषी मंत्री तोमर यांनी म्हटले आहे.  

रेल्वेसाठी आपल्याकडे पूर्वी स्वतंत्र अर्थसंकल्प (separate budget) होता. मात्र केंद्र सरकारने सुधारणा करून रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश मुख्य अर्थसंकल्पात केला.

अर्थसंकल्प एक असो वा स्वतंत्र असोत, त्यासाठी वाटचालीची दिशा असायला हवी, संबंधित क्षेत्रासाठी पुरेशा तरतुदी असायला हव्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीची महत्वाकांक्षा असायला हवी, असेही तोमर यांनी नमूद केले आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT