mustard  
मुख्य बातम्या

Mustard price: देशातील बाजारांत मोहरीचे दर तेजीत

जागतिक खाद्यतेल दरात झालेल्या वाढीचा फायदा मोहरीलाही होत आहे. सोयाबीनप्रमाणे मोहरीला मागणी आहे. मात्र नवीन माल बाजारात येईपर्यंत मोहरी जास्त उपलब्ध होणार नाही. यंदा सरकारने मोहरीला ५ हजार ५० रुपये हमीभाव जाहिर केला. मात्र सध्या बाजारभाव ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

अनिल जाधव

पुणेः देशात यंदा मोहरीचे (Mustard) उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता आहे. मात्र जागतिक खाद्यतेल (Edible Oil) बाजार तेजीत आहे. देशातील सोयाबीनही (Soybean) भाव खातेय. याचा फायदा मोहरीला होताना दिसतोय. मोहरीचे भाव हमीभावापेक्षा (MSP) अधिक आहेत. मोहरीचा हमीभाव ५ हजार ५० रुपये आहे. तर सध्या बाजारात ६ हजार ते ७ हजार रुपये दर मिळत आहे, असे जाणकारांनी सांगितले.  देशात यंदा मोहरी लागवडीत मोठी वाढ झाली. देशातील मोहरीखालील सरासरी क्षेत्र ६१ लाख हेक्टर आहे. मात्र सरकारी आकड्यानुसार यंदा ७८ लाख हेक्टरवर मोहरी पीक आहे. तर मगील वर्षी क्षेत्र सरासरीपेक्षाही कमी म्हणजेच ६० लाख हेक्टरवर होते. यंदा लागवड जवळपास २८ टक्यांनी वाढली. मात्र व्यापारी सूत्रांच्या मते यंदा देशात ८७ लाख हेक्टरवर मोहरी पीक आहे. त्यातच पोषक वातावरण असल्याने उत्पादनही विक्रमी पातळीवर पोचण्याचा सरकारचा अंदाज आहे. हे ही वाचाः देशातील बाजारात कापूस दरात सुधारणा

सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाजात मोहरी उत्पादन ११४ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त केला. तर व्यापारी संघटनांच्या मते १११ लाख टन मोहरी हाती येईल. तर काही जाणकारांच्या मते देशातील मोहरी उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावेल. असे वेगवेगळे अंदाज असले तरी यंदा उत्पादन वाढणार हे नक्की. जागतिक खाद्यतेल दरात झालेल्या वाढीचा फायदा मोहरीलाही होत आहे. सोयाबीनप्रमाणे मोहरीला मागणी आहे. मात्र नवीन माल बाजारात येईपर्यंत मोहरी जास्त उपलब्ध होणार नाही. यंदा सरकारने मोहरीला ५ हजार ५० रुपये हमीभाव जाहिर केला. मात्र सध्या बाजारभाव ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तेलासाठी मोहरीला मागणी कायम आहे. त्यामुळे हंगामाच्या तोंडावर दर तेजीत आहेत. मागील हंगामातील मोहरीचे गाळप जवळपास झालेले आहे. त्यामुळे प्रक्रिया प्लांट्सकडे मोहरीचा साठा नाही. प्लांट्स नवीन मालाची आवक वाढण्याची वाट पाहत आहेत. देशात सोयातेल तेजीत आहे. त्याचाही लाभ मोहरीला मिळाला. जागतिक बाजारातील स्थिती पाहता मोहरीचे दर लगेच नरमण्याची शक्यता कमीच आहे, असे जाणकारांनी सांगितले. हे ही वाचाः सोयाबीन बाजार आठवड्यात स्थिर राजस्थानमध्ये मोहरीला सरासरी ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर मध्य प्रदेशात ६ हजार ते ६ हजार ८०० रुपयाने मोहरीचे व्यवहार झाले. मोहरीसोबतच तेलाचेही दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात मोहरी तेलाला १० किलासाठी  १ हजार ५२० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर मोहरी पेंडेचे दर प्रतिटन २३ हजार ५०० रुपयांवर होते.  देशात सोयाबीन आणि मोहरीवरच खाद्यतेल उपलब्धतेची भीस्त आहे. त्यामुळे सोयाबीनमधील तेजीचा फायदा मोहरीला होत आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा

Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

Solid Waste Management: घनकचरा व्यवस्थापनासाठी पिंपळगाव बसवंतला सव्वासात कोटी

Rural Water Crisis: महाड तालुक्यात गावे तहानलेली

Shaktipeeth Highway Protest: खाकी वर्दीची दडपशाही खपवून घेणार नाही, शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संतप्त, विटा 'तहसील'वर आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT