The return journey of the monsoon stop
The return journey of the monsoon stop Agrowon
मुख्य बातम्या

Monsoon Rain : माॅन्सूनचा परतीचा प्रवास आज रेंगाळला

Team Agrowon

राज्यात बुधवारी काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) झाला. तर काही ठिकाणी जोरदार  सरी पडल्या.

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात काही मंडळांमध्ये जोरदार सरी पडल्या. तर हवामान विभागानं (Department Of Metrological) उद्या सकाळपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

देशातून माॅन्सूनने परतीचा (Monsoon Return) प्रवास सुरु केलाय. यंदा गेल्यावर्षीपेक्षा १४ दिवसांनी माॅन्सूनचा परतीचा प्रवास लवकर सुरु झालाय. मंगळवारी नैर्ऋत्य राजस्थान आणि कच्छमधून मॉन्सून परतलाय.

बुधवारी माॅन्सूनने परतीचा प्रवास केला नाही. माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सीमा आजही खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि नालिया पर्यंतच्या भागात कायम होती.

कोकणात आज पावसाचा जोर कमी होता. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर इतर भागांमध्ये पावसाची उघडीप कायम होती. मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील राहुरी येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला.

नाशिक जिल्ह्यातील येवला, पेठ आणि त्र्यंबकेश्वर येथे मध्यम पावसाची नोंद झाली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव आणि महाबळेश्वर येथे पावसानं हेजरी लावली.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. तर वाशी मंडळातही मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. लातूर जिल्ह्यातील निलंगा, देवणी आणि लातूर मंडळात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मंडळात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि इतर मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या.

विदर्भातील अनेक मंडळात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गडचिरोली मंडळात १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर देसाईगंज मंडळात १०० मिलिमीटर पाऊस झाला. तसचं आरमोरी, चार्मोशी, अहेरी या मंडळांमध्ये जोराचा पाऊस झाला.

गोंदीया मंडळातही १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे १०० मिलिमीटर पाऊस पडला. तर इतर मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या.

हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक मंडळांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT