flood disaster  agrowon
मुख्य बातम्या

Disaster Relief Fund: केंद्राकडून महाराष्ट्राला झुकत माप ; आपत्ती व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक निधी

Disaster Response Funds : अतिवृष्टी, गारपीठ आणि अवकाळी पावसाळ्यातील नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने आपत्ती निवारणासाठी ७ हजार ५३२ कोटी रुपयांचा निधी वितरित केला. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १ हजार ४२० कोटी ८० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

Team Agrowon

Disaster Relief : देशाच्या उत्तरेकडील भागात पावसाने कहर केल्यामुळे अर्थ मंत्रालयाने बुधवारी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत २२ राज्य सरकारांना ७,५३२ कोटी रुपये वितरित केला. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना ही मदत देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार ही रक्कम जारी करण्यात आले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 48(1)(a) अंतर्गत प्रत्येक राज्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) ची स्थापना करण्यात आली आहे. हा निधी अधिसूचित आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी राज्य सरकारांना उपलब्ध असलेला प्राथमिक निधी आहे. केंद्र सरकार सामान्य राज्यांमध्ये SDRF मध्ये 75 टक्के आणि ईशान्य आणि हिमालयीन राज्यांमध्ये 90 टक्के योगदान देते. वित्त आयोगाने शिफारस केल्यानुसार वार्षिक केंद्रीय योगदान दोन समान हप्त्यांमध्ये जारी केले जाते.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निधी मागील हप्त्यात जारी केलेल्या रकमेचा वापर प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि SDRF द्वारे केलेल्या उपक्रमांबद्दल राज्य सरकारकडून अहवाल मिळाल्यावर जारी केला जातो. मात्र, सध्याची परिस्थिती पहाता या वेळी निधी देताना या अटी माफ करण्यात आल्या.

SDRF चा वापर केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, कीटकांचे हल्ले आणि थंडी आणि थंडीची लाट यांसारख्या अधिसूचित आपत्तीतील पीडितांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी केला जाणार आहे. राज्यांना SDRF निधीचे वाटप मागील खर्च, क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि आपत्ती जोखीम निर्देशांक यासारख्या अनेक घटकांवर आधारित आहे. हे घटक राज्यांची संस्थात्मक क्षमता, जोखीम, धोका आणि असुरक्षा दर्शवतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra crop damage : राज्यात १२ ते १४ लाख एकरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा

Fish Farming : विदर्भात मत्स्य व्यवसायातून निळ्या क्रांतीला चालना

Illegal Pest Control : विनापरवाना पेस्ट कंट्रोल करणाऱ्या विरोधात ‘गुणनियंत्रण’ची कारवाई

Backyard Poultry : सुधारित पद्धतीने परसातील कुक्कुटपालन

Pearl Farming : शिंपल्यांच्या शेतीतून दर्जेदार मोती

SCROLL FOR NEXT